Letest News
शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ
राजकीयशिर्डी

छत्रपती शासनाची बातच न्यारी-अवघ्या ११ रुपयांत महिलांची शिवनेरी गडस्वारी-महिला शिवभक्तांसाठी किल्ले शिवनेरी दर्शनाचे ऐतिहासिक आयोजन

शिवप्रेम, इतिहासाची जाणीव आणि स्वराज्याची प्रेरणा जिवंत ठेवण्यासाठी शिवजयंती उत्सव २०२६ निमित्त शिर्डी शहरात एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत आहे.
किल्ले शिवनेरी || आधारस्तंभ छत्रपती शासन, शिर्डी शहर तसेच सामाजिक सेवाभावी संघटना, शिर्डी शहर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी – किल्ले शिवनेरी (जुन्नर) येथे फक्त महिलांसाठी किल्ले दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीशक्तीला दिलेला सन्मान, त्यांच्या राज्यकारभारातील न्यायप्रियता आणि स्वराज्याच्या संकल्पनेत महिलांचा असलेला मानाचा सहभाग लक्षात घेता, महिलांसाठी स्वतंत्रपणे राबविण्यात येणारा हा उपक्रम विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
या किल्ले दर्शनाच्या माध्यमातून महिला शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण, जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार, शिवनेरी किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा तसेच स्वराज्य उभारणीचा संघर्ष जवळून अनुभवता येणार आहे.

इतिहास केवळ पुस्तकात न राहता तो प्रत्यक्ष अनुभवता यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
प्रस्थानाची सविस्तर माहिती
ही ऐतिहासिक सहल दि. ८ फेब्रुवारी २०२६, रविवार रोजी सकाळी ७ वाजता शिर्डी येथील साईबाबा संस्थान फ्री पार्किंग, साईनगर मैदान मागे येथून प्रस्थान करणार आहे.
या उपक्रमासाठी प्रवेश शुल्क केवळ ११ रुपये ठेवण्यात आले असून, महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, या उद्देशाने शुल्क अत्यल्प ठेवण्यात आले आहे.


विशेष सोयीसुविधा
या सहलीदरम्यान सहभागी महिलांसाठी

  • नाश्ता व जेवणाची संपूर्ण व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आलेली आहे.
  • सहभागी महिलांसाठी वयाची मर्यादा १४ ते ५० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
  • सुरक्षितता व शिस्तबद्ध नियोजनासाठी स्वयंसेवकांची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.
    नावनोंदणीची अंतिम तारीख
    या उपक्रमासाठी नावनोंदणी दि. ५ फेब्रुवारी २०२६ पर्यंतच करण्यात येणार असून, मर्यादित आसनसंख्या असल्याने इच्छुक महिलांनी तातडीने नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

  • संपर्क
    नावनोंदणी व अधिक माहितीसाठी
    📞 7666106118 या क्रमांकावर संपर्क साधावा.
    शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणारा हा उपक्रम केवळ सहल नसून, तो इतिहास, संस्कार आणि राष्ट्रप्रेमाची जाणीव करून देणारा प्रेरणादायी प्रवास ठरणार आहे. शिर्डी शहरातील व परिसरातील महिला शिवभक्तांनी या ऐतिहासिक किल्ले दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
    🚩 जय भवानी… जय शिवाजी! 🚩

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button