
श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रद्धा, आस्था आणि संस्कृतीचे प्रतीक असलेली गोदावरी नदी सध्या वाळू माफियांच्या क्रौर्याची साक्षीदार ठरत आहे.
नायगाव गावच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशातून केवळ पर्यावरणाचा ऱ्हासच नाही, तर थेट मानवी जीवही हिरावून घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
दि. ११ जानेवारी २०२६ रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, शेती गट नं. ३९० लगत गोदावरी नदीच्या पात्रात जेसीबी मशीन उतरवून वाळू उपसा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.
जेसीबी थेट नदीत, प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू चोरी
पोलीस उपनिरीक्षक सतीश डौले, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व पोहेकॉ ढोकणे यांनी घटनास्थळी भेट दिली असता,
जेसीबी क्रमांक MH-17-CX-4825 नदीच्या पाण्यात उभी असल्याचे स्पष्टपणे आढळून आले.
स्थानिक पोलीस पाटील व ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार,
निलेश एकनाथ शेंडगे, निलेश दिपक जाधव, अमित परशुराम कुटे, शंकर उमाप, चेतन पेत्रस खाजेकर तसेच इतर काही इसमांनी
कोणताही परवाना नसताना संगनमत करून गोदावरीतील वाळूचा उपसा सुरू केला होता.
महागड्या गाड्यांचा ताफा – संघटित टोळीचा संशय
या बेकायदा कारवाईसाठी आरोपी
डिझायर कार (MH-20-FY-6022)
क्रेटा कार (MH-17-DC-8883)
तसेच तीन विना नंबरच्या मोटार कार
यांचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकारामुळे नायगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाळू माफियांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे.
जमीन खरेदीचा व्यवहार आणि मृत्यूचा सापळा
या वाळू तस्करीच्या पार्श्वभूमीवर उघडकीस आलेले निलेश शेंडगे हत्या प्रकरण अधिकच धक्कादायक ठरत आहे.
नेवासा येथील रहिवासी, शिवभक्त व लहुजी सैनिक निलेश शेंडगे हे नायगाव परिसरात जमीन खरेदीसाठी गेले असताना,
वाळू तस्कर व दाभाडे टोळीने संगनमत करून त्यांना लक्ष्य केल्याचा गंभीर आरोप आहे.
तपासात समोर येत असलेल्या माहितीनुसार,
त्यांना निर्घृण मारहाण करून गोदावरी नदीत बुडवून जीवे ठार मारण्यात आले.
घटनेनंतर दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह नदीपात्रात आढळून आल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला.
खुनाचे कलम वाढले – आरोपींच्या अडचणी वाढल्या
या प्रकरणी सुरुवातीला दाखल असलेल्या गुन्ह्यात आता
खुनाचे गंभीर कलम वाढविण्यात आले असून,
तपास अधिक व्यापक स्वरूपात सुरू आहे.
पोलीस तपासानुसार या प्रकरणात खालील आरोपींचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे :
आसिफ कैची (श्रीरामपूर, वार्ड नं. ०२)
अकील बिल्डर
सलीम
अर्जुन दाभाडे
सागर भोसले
विजय पवार
उद्देश मंडलिक
शुभम राणा (मेजर)
मयुर शिर्के
राहुल धुमाळ
चव्हाण
(तसेच इतर संशयित)
प्रशासनासमोर गंभीर प्रश्न
गोदावरी नदीत जेसीबी, महागड्या गाड्या आणि मोकाट वाळू चोरी
हे सर्व प्रशासनाच्या माहितीसह चालू होते का?
वाळू माफियांना राजकीय किंवा आर्थिक अभय मिळत आहे का?
पर्यावरणाचा ऱ्हास, कायद्याची पायमल्ली आणि थेट हत्या —
या साखळीमुळे वाळू तस्करी ही केवळ आर्थिक गुन्हा नसून, संघटित गुन्हेगारी असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.
जनतेची मागणी
या प्रकरणातील
✔ सर्व आरोपींना अटक
✔ वाळू माफियांचे संपूर्ण नेटवर्क उघड
✔ दोषींवर कठोर कारवाई
✔ गोदावरी नदीचे संरक्षण
यासाठी जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

