Letest News
पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद
अ.नगर

५३ गुन्ह्यांनंतर प्रशासन जागे झाले! शनी शिंगणापूरात ‘लटकू’ एजंटांचे साम्राज्य जमीनदोस्त!

शनी शिंगणापूरात ‘लटकू’ एजंटांवर प्रशासनाचा दणका
भाविकांची पिळवणूक करणाऱ्यांवर SDM सुधीर पाटील यांचे कठोर प्रतिबंधात्मक आदेश
५३ गुन्ह्यांनंतर अखेर कारवाई, अन्यथा शनीदेवाच्या नावाने सुरू होती उघड लूट!

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


अहिल्यानगर | दि. १३
देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूर येथे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एजंटराजाला (लटकू) अखेर प्रशासनाने चाप लावला आहे. भाविकांची उघड आर्थिक पिळवणूक, दमदाटी, फसवणूक आणि मनमानी करणाऱ्या खासगी एजंटांविरोधात उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १५२ (१)(a) अन्वये कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.


श्रद्धेच्या नावाखाली खुलेआम लूट
‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या शनिशिंगणापूर येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, मंदिर परिसर, प्रवेश मार्ग व गावाबाहेरील रस्त्यांवर लटकू एजंटांकडून वाहन अडवून भाविकांना विशिष्ट दुकानांतूनच चढ्या दराने पूजा साहित्य खरेदी करण्यास सक्ती केली जात होती. विरोध केल्यास शिवीगाळ, दमदाटी आणि धमक्या देण्याचे प्रकार सर्रास घडत होते.
पोलीस व तहसीलदारांच्या अहवालानुसार सन २०२५ मध्ये अशा ५३ गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असून, भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने ही कठोर पावले उचलली आहेत.


प्रशासनाचे थेट आणि स्पष्ट आदेश
🚫 वाहने अडविण्यास पूर्ण बंदी
गावातील किंवा गावाबाहेरील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी भाविकांची वाहने अडविणे, थांबविणे किंवा जबरदस्तीने कुठेही पाठविणे बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे.


🛑 खरेदी व व्यवहारात सक्ती नाही
भाविकांना कोणत्याही ठराविक दुकानातूनच खरेदी, निवास किंवा सेवा घेण्याची सक्ती करता येणार नाही. भाविकांची निवड ही अंतिम असेल.
❌ तोतयागिरीला आळा
कोणत्याही खासगी व्यक्तीने देवस्थान ट्रस्ट, पोलीस किंवा प्रशासनाचा प्रतिनिधी असल्याचे भासवू नये.
⛔ मध्यस्थी धंद्यांना मनाई
भोजन, निवास, दर्शन किंवा पूजेच्या नावाखाली कोणतीही दलाली किंवा मध्यस्थी पूर्णतः बंद.
उल्लंघन केल्यास थेट गुन्हा!

या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये कठोर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच संबंधितांना २८ जानेवारी २०२६ पर्यंत SDM कार्यालय, अहिल्यानगर येथे आपली हरकत मांडण्याची संधी देण्यात आली आहे.
पोलीस अलर्ट मोडवर
शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना शून्य तडजोडीने अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.


एक सवाल मात्र उरतो…
५३ गुन्हे झाल्यावरच कारवाई का?
याआधी या लटकूंना कोणाचा आशीर्वाद होता?
भाविकांची श्रद्धा विक्रीसाठी नाही — प्रशासनाचा स्पष्ट संदेश!
🚩 शनी शिंगणापूरात आता ‘लटकूगिरी’ चालणार नाही!

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button