Letest News
साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या भाविकांवर डल्ला! शिर्डीत चैनस्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद-स्थ... १५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्... ग्रामीण स्वप्नांना सरकारी नोकरीची वाट-शिर्डीच्या साई निर्माण करिअर अकॅडमीमधून ७० जण सेवेत
राजकीयशिर्डी

शिर्डी परिक्रमा उत्सव २०२६ च्या कार्याध्यक्षपदी मनीलाल पटेल यांची निवड – सर्वत्र अभिनंदन

शिर्डी (प्रतिनिधी):
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, ग्रीन अँड क्लिन शिर्डी तसेच समस्त शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या शिर्डी परिक्रमा उत्सव २०२६ च्या कार्याध्यक्षपदी श्री मनीलाल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल शिर्डी परिसरात सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत असून विविध स्तरांतून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.
भक्ती, सेवा आणि शिस्तीचा संगम
परिक्रमा उत्सवाला लाभणार सक्षम नेतृत्व
सामाजिक, धार्मिक व सेवाभावी कार्यात नेहमी सक्रिय असलेले श्री मनीलाल पटेल हे साईभक्तांमध्ये परिचित नाव आहे. त्यांच्या अनुभव, नियोजन क्षमता आणि सेवाभावामुळे यंदाचा शिर्डी परिक्रमा उत्सव अधिक शिस्तबद्ध, स्वच्छ व भक्तिमय वातावरणात पार पडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य परिक्रमा
खंडोबा मंदिरातून प्रस्थान
शिर्डी परिक्रमा उत्सव २०२६ शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी शिर्डी येथील खंडोबा मंदिरापासून सुरू होणार असून, यामध्ये देश-विदेशातील हजारो साईभक्त सहभागी होणार आहेत. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि भक्तीभाव या त्रिसूत्रीवर आधारित परिक्रमेचे यंदाचे आयोजन असणार आहे.
मित्रपरिवाराकडून विशेष शुभेच्छा
“साईसेवेला नवे बळ मिळेल” असा विश्वास
आमचे मित्र श्री मनीलाल पटेल यांची या मानाच्या पदावर निवड झाल्याबद्दल मित्रपरिवार, साईभक्त, सामाजिक संस्था व ग्रामस्थांकडून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी परिक्रमा उत्सव अधिक यशस्वी आणि प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button