
श्रीरामपूर प्रतिनिधी श्रीरामपूर येथील अभिषेक जितेंद्र मराठेनगर अभियंता, नगर परिषद, श्रीरामपुर यांनी फिर्यादी होऊन फिर्याद दिली आहे की, मी वरील ठिकाणी राहण्यास असुन मी श्रीरामपुर नगर परिषदेमध्ये नगर अभियंता या पदावर कार्यरत आहे. सध्या माझ्याकडे शहरातील पाणी पुरवठा विभाग,

आरोग्य विभाग या दोन विभागांचा अतिरिक्त कार्यभार आहे. श्रीरामपुर शहरातील पाणी पुरवठा बाबतीत तसेच आरोग्य बाबतीत असणारे अडचणी व इतर बाबींबाबत कारवाई करणे व देखरेख ठेवण्याचे काम माझ्याकडे आहे. श्रीरामपुर नगर परिषदेचे गॉधवणी येथे दोन तलाव असुन तिथे जलशुध्दीकरण केंद्र देखील आहे.
फेब्रुवारी महिन्यात पाटाचे पाण्याचे आवर्तन बंद असल्याने वरीष्ठांचे आदेशाने मिल्लतनगर येथील साठवण तलावाचे विस्ताराचे काम माझ्या देखरेखी खाली चालू होते.
साठवण तलावाचे काम चालु होते. त्या ठिकाणी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता निलेश गजानन पाटील असे हजर होतो. तेव्हा आमचे लक्षात आले की, पाटाचे आवर्तन बंद होते.
तरी पाण्याचे पाईपलाईन मधुन तलावात पाणी येत असल्याचे आमच्या लक्षात आले. सदरचे पाणी अतिशय दुर्गंधीयुक्त व घाण असल्याचे आमचे निदर्शनास आले. तेव्हा आम्ही नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्लंबर सागर माधव हिवाळे, उमेश गोरख बर्वे व संदिप देवकर अशांना त्या ठिकाणी बोलावून घेतले.
व त्यांना बॅटरीचे प्रकाशात पाईपलाईनचे आतमध्ये शोध घेण्याकरीता पाठविले. त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितले की, सदरच्या पाईपलाईनला वरचे बाजूस तीन ठिकाणी कशाचे तरी सहाय्याने मोठे छिद्र पाडलेले दिसत आहे. व त्यातून जाणीव पुर्वक सांडपाणी पाईप लाईनमध्ये सोडण्यात आले. तेव्हा आम्ही सदर पाईपलाईनचे वरील बाजुस जाऊन पाहणी केली.
सदरचे छिद्र केलेल्या घरांची खात्री केली असता ते 1) हनिफशाह उस्मान शाह घर क्र.1699/1/1 मालमत्ता क्रमांक SHRM00008146,2) फिरोज रशिद पठाण घर क्रमांक-1698/1/1 मालमत्ता क्रमांक SHRM00008146,3) रऊफ उस्मान शाह घर क्रमांक 1697/1/1 मालमत्ता क्रमाक SHRM000019539 सर्व रा. गार्ड रेसिडेन्सी शेजारी, साठवण तलावाशेजारी,
मिल्लतनगर वार्ड नं.।, श्रीरामपुर असे असल्याची खात्री झाली. सदरबाबत आम्ही श्रीरामपुर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्री. मच्छिंद्र घोलप यांना याबाबत माहीती दिली होती. त्यावेळी सदर इसमांना नोटीस देण्यात आली आहे.
तरी दिनांक-06/02/2025 सकाळी 10.00 वा.चे पुर्वी इसम नामे 1) हनिफशाह उस्मान शाह घर क्र. 1699/1/1 मालमत्ता क्रमांक SHRM00008146.2) फिरोज रशिद पठाण घर क्रमांक-1698/1/1 मालमत्ता क्रमांक SHRM00008146,3) रऊफ उस्मान शाह घर क्रमांक 1697/1/1 मालमत्ता क्रमांक-SHRM000019539 सर्व रा. गार्ड रेसिडेन्सी शेजारी, साठवण तलावाशेजारी, मिल्लतनगर वार्ड नं.।,
श्रीरामपुर अशांनी श्रीरामपुर नगर परिषदेचे पिण्याचे पाण्याचे पाईप लाईन मध्ये कशाचे तरी सहाय्याने मोठे छिद्र करुन सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. व त्यात त्यांचे घरातील सांडपाणी जाणीव पुर्वक सोडुन शहरातील नागरिकांस पिण्याकरीता देण्यात येणा-या पाण्याची योग्यता कमी केली. असे कृत्य केले आहे. म्हणुन माझी वरील आरोपींविरुध्द सरकारतर्फे कायदेशीर वरील तिघीणविरोधात फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे