Letest News
राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु...
अ.नगरक्राईम

“तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?”रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई | प्रतिनिधी
तलाठी भरती (२०२३) प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?” असा सवाल करत त्यांनी सरकारची भूमिका धारेवर धरली.
रोहित पवार यांनी तलाठी भरती प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखली गेली पाहिजे, अशीही त्यांनी भूमिका मांडली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून विरोधकांनी सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. तलाठी भरती प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, या प्रकरणावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील किंवा राज्य सरकारची अधिकृत सविस्तर प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या आरोपांवर सरकार काय भूमिका घेते, याकडे राज्यभरातील उमेदवार आणि जनतेचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button