Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरशिर्डी

श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिर्डी येथे शिवराज्यभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न

शिर्डी :

sai nirman
जाहिरात

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिर्डी येथे दिनांक ०६ जून २०२५ रोजी शिवराज्यभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करणेत आले.

DN SPORTS

kamlakar

त्याअनुषंगाने मा.श्री. मंगलप्रभात लोढा, मंत्री कौशल्य रोजगार उदयोजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे संकल्पनेनुसार सदर कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व आयटीआयमध्ये आयोजित केलेला होता.

सुरुवातीला संस्थेतील विविध प्रशिक्षणार्थ्यांमार्फत तयार करणेत आलेल्या मॉडेलची आकर्षक मांडणी करुन तंत्रज्ञानावर आधारीत मशिनरीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, (भा.प्र.से.) यांचे शुभहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात सुरुवातीस, प्रतिमा पूजन झालेनंतर, मा.श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व श्रीमती मनिषा वर्मा (भा.प्र.से.) मा. अप्पर मुख्य सचिव, कौशल्य रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांनी शिवराज्यभिषेक दिनानिमित्त प्रशिक्षणार्थ्यांना दृकश्राव्य पध्दतीने संदेश दिला.

सदर प्रसंगी कौशल्य रोजगार उदयोजकता व नाविन्यता विभाग यांचे सुचनेनुसार आयटीआयमधील विद्यार्थ्यामध्ये चांगले विचार रुजविण्यासाठ ” स्वदेशी विचारांचा प्रसार ” या विषयावर श्री. यशोदीप शेटे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करणेत आले.

याप्रसंगी बोलतांना श्री गोरक्ष गाडीलकर, (भा.प्र.से.) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार – विचारांचे अनुकरण केल्यास एक नवीन भारत देश निर्माण होईल असे मत मांडले. संस्थेतून शिक्षण घेऊन गेलेले तसेच सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीनी तयार केलेले विविध प्रकारचे तंत्रज्ञान, मशिनरी यांचे प्रदर्शन व परिक्षण श्री साईबाबा संस्थानमध्ये करणेत येईल जेणेकरुन सदर तंत्रज्ञानाची दखल संस्थानकडून घेतली गेल्यामुळे अधिकाधिक नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होईल असे म्हणाले.

या कार्यक्रमात संस्थेचे प्राचार्य अभयकुमार दुनाखे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री विकास पाटील यांनी केले.सदर कार्यक्रमास संस्थानचे प्रशासकीय अधिकारी श्री भिकन दाभाडे, श्री विश्वनाथ बजाज, गटनिदेशक श्री दादा जांभूळकर, सर्व निदेशक, कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येन उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button