Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
अ.नगरराजकीय

मुंबईत कोरोना!दोघांचा मृत्यू!तरी अधिक काळजी घेण्याची गरज!

शिर्डी ( प्रतिनिधी) सन २०१९ आणि त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोविडने पुन्हा एकदा डोके वर काढायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. वाढत्या कोविड रुग्णांमध्ये, मुंबईत केईएम रुग्णालयात दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. या दोन्ही रुग्णांचे कोविड रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

परंतु रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे की एका रुग्णाचा मृत्यू कर्करोगामुळे झाला. तर, दुसऱ्याचा किडनीच्या गंभीर आजाराने झाला आहे. तथापी डॉक्टर आणि बीएमसी अधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्यास सांगितले आहे. आणि लोकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे.

परळ येथील ५९ वर्षीय महिलेचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. महिलेला कर्करोग होता, रुग्णालयाने मृतदेह कुटुंबाला देण्यास नकार दिला. कुटुंबाने माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्याशी संपर्क साधला. अनिल कोकीळ म्हणाले की, महिलेला कर्करोग होता, परंतु तिचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला.

अशा परिस्थितीत, रुग्णालयाने प्रोटोकॉलनुसार मृतदेह कुटुंबाला दिला नाही. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी बोलल्यानंतर, मृतावर कोविड प्रोटोकॉलनुसार कुटुंबातील फक्त दोन सदस्यांसह भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

यामुळे परत कोरोना येतो की काय? अशी भीती नागरीकांना वाटत आहे.तरी यापुढे प्रशासन,आरोग्य विभाग,व नागरीकांनी अधिक खबरदारी घेतली पाहिजे.असे बोलले जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button