Letest News
लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल...
अ.नगरक्राईम

अहिल्यानगर जिल्ह्यातही रात्री अकरानंतर मेडिकल्स मधून विकली जाणारी शीतपेये विक्री करावी बंदी!

शिर्डी( प्रतिनिधी) राज्यामध्ये सर्व मेडिकल्स 24 तास सुरू असतात. मात्र काही मेडिकल्स मध्ये विविध शीतपेय विक्रीसाठी ठेवले जात असतात. अनेक मेडिकलचा जनरल स्टोअर्स सारखा वापर करतात. हे लक्षात आल्यामुळेच 24 तास सेवा देणाऱ्या मेडिकल स्टोअर्सना आता रात्री 11 नंतर शीतपेय विकता येणार नाहीत. रत्नागिरी पोलिसांनी दिवस-रात्र सेवा देणाऱ्या मेडिकल स्टोअर्सना नोटीसा बजावून रात्री 11 नंतर शीतपेय विकू नयेत अशा सूचना दिल्या आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


जर कोणी मेडिकल विक्रेता शीतपेय विकताना दिसला तर त्याला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. शिर्डीतही अनेक मेडिकल्स मधून शीतपेय विकली जातात तसेच जनरल स्टोअरच्या इतर वस्तूही मेडिकल्स मधून विकल्या इतर दुकाने अकरा वाजता रात्री बंद होतात. मात्र मेडिकल्स यांना 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी आहे. त्याचाच फायदा घेऊन अनेक मेडिकल्स वाले रात्री 11 नंतरही शीतपेय विकतात इतर जनरल स्टोअर्स मधील वस्तू विकतात.

सध्या अनेक ठिकाणी शिर्डीतही डिप्रेशनच्या गोळ्या शीतपेयात टाकून त्याची नशा करणारी मंडळी असल्याची चर्चा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 24 तास मेडिकलच्या नावावर जनरल स्टोअर्स चालवणाऱ्यांची पोलिसांनी झोप उडवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाच्या विरोधात पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. पोलिसांकडून कारवाई सुरू असताना आणखी एक माहिती पुढे आली ती म्हणजे डिप्रेशनच्या गोळ्या शीतपेयात टाकून शीतपेय नशा म्हणून प्यायली जातात.


रात्री उशीरा काही मेडिकलमध्ये शीतपेय मिळतात. ही शीतपेय घेऊन नशाबाज मंडळी नशा करतात. त्यामुळे पोलिसांनी 24 तास सुरु असलेल्या मेडिकल दुकानांना नोटीसा काढून त्यांची झोप उडवली आहे. अशा मेडिकलना 24 तास फक्त औषधे विकण्यासाठीच परवानगी असते. अन्य वस्तू अर्थात शीतपेय आणि आईस्क्रीम विकायला परवानगी नसते.
पण अनेक मेडिकल दुकानदार रात्रभर औषधांपेक्षा जनरल स्टोअर्सची सेवा देतात.

अशा सर्व 24 तास सेवा देणाऱ्या मेडिकल दुकानांना नोटीसा काढून रात्री 11 नंतर शीतपेय विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. रात्री अकरानंतर जर कोणी मेडिकल दुकानदार शीतपेय विकताना आढळला तर त्याला 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.दिवस-रात्र सेवेच्या नावावर 24 तास जनरल स्टोअर्स चालवणाऱ्या मेडिकल दुकानदारांचे पोलिसांच्या आदेशानंतर धाबे दणाणले आहेत.

काही मेडिकलवाल्यांनी तर बाहेर फलकच लावून टाकला आहे. रात्री 11 नंतर आईस्क्रीम, शीतपेय व अन्य अन्नपदार्थ मिळणार नाहीत. फक्त औषधे मिळतील. अशी रत्नागिरी जिल्ह्यात परिस्थिती आहे .मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात सर्व काही खुलेआम सुरू आहे. 24 तास मेडिकलच्या नावावर जनरल स्टोअर्स चालवणाऱ्यांनी जिल्ह्यात विशेषता शिर्डीतही मोठा धुमाकूळ चालवला आहे.

मेडिकल वाल्यांना 24 तास मेडिकल सुरू ठेवण्याची परवानगी आहे .मात्र या मेडिकलमध्ये अनेक प्रकारची शीतपेये व विविध जनरल स्टोअर्स दुकानात मिळणाऱ्या वस्तू ठेवल्या जातात व त्या विकल्या जातात. मात्र त्याकडे पोलीस किंवा कोणाचेही लक्ष जात नाही. ज्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांनी अशा मेडिकल्स दुकानदारांना 11 नंतर शीतपेये विकण्यास बंदी केली आहे तसेच शिर्डीतही करावी. अशी मागणी आता साईभक्त व सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button