Letest News
भोंदू लिंगपिसाट अशोक खरातचा काळा कारभार उघड — कोट्यवधींच्या जमीन हडपगुन्हा दाखल-दोघे ताब्यात दोघे फर... साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा
अ.नगरक्राईम

महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात कुठेही नाही

शिर्डी (प्रतिनिधी) शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात कुठेही नाही. पोलिसांनी छाप्यात ५० लाख पकडले, तरी ५० हजार रुपयेच दाखवतात असं विधान त्यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलं आहे.’पोलीस खात्यासारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात, जगात कुठेही नाही. शासनाने कोणताही कायदा केला, की यांचा एक हप्ता वाढला,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

गुटखा बंदी केली तर गुटखा द्यायचा पण यांचा हप्ता वाढला. दारू बंद केली की चालू करायची, यांचा एक हप्ता वाढला. या राज्यातील पोलिसांनी, देशातील पोलिसांनी इमानदारीने काम केलं ना, तर या जगातील सगळी गंदगी खतम होईल. यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ एवढं चांगलं केलं, तर सगळी गुन्हेगारी खतम होईल’,

अशा शब्दात यांनी पोलिसांवर खालच्या पातळीवर टीका केली आहे.दरम्यान, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरही प्रतिक्रिया दिली होती. २६ चा बदला २६० ने घ्या अशा शब्दात त्यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला होता. पुन्हा एकदा त्यांनी पीओकेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. संजय गायकवाड हे निर्भीड बोलणारे नेते आहेत.

त्यांनी पोलीस दला विषयी आपले व्यक्तिगत मत व्यक्त केले असले तरी राज्यात त्यामुळे मोठा गहजब उडाला आहे. पोलीस दलामध्ये सर्वच पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी हे एक सारखे नसतात. काही चांगले असतात. पण काही आपल्या मर्जीप्रमाणे वागतात. सदरक्षणाय खिलनिग्रणाह, हे पोलीसी ब्रीदवाक्य आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत आ. संजय गायकवाड यांनी म्हटल्याप्रमाणे काही पोलिसांची दबंग शाही सुरू असलेली दिसते.

कोणी कितीही मोठा किंवा अधिकारी असो मात्र भारतात कायदा आहे. संविधान आहे. त्यावरच हा भारत देश सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अधिकार असला म्हणजे त्या अधिकाराचा गैरवापर करणे चुकीचे आहे. सध्या काही ठिकाणी अशा अधिकाराचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे.

असे प्रकार घडू नये. असेच आमदार संजय गायकवाड यांच्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे. महाराष्ट्र पोलीस दल देशात सर्वोत्कृष्ट समजले जाते. त्यामुळे आपल्या पोलीस दलाची शान आहे तसीच अबाधित राहावी म्हणून प्रत्येक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनीही स्वतःहून तसे प्रयत्न केले पाहिजे.असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button