Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
क्राईमशिर्डी

शिर्डीत संस्थान परिसरातील अब्दुल बाबांच्या समाधीं ठिकाणी संस्थानचे कर्मचारी नियुक्त करून तेथील देणगी संस्थांनने घ्यावी

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डीतील संस्थान परिसरात असणाऱ्या अब्दुल बाबांच्या समाधीवरील येणारे दान साईसंस्थांनकडे यावे तसेच अब्दुल बाबांच्या समाधीची जबाबदारी साईबाबा संस्थानने घ्यावी. त्यासाठी साई संस्थान प्रशासनाने त्वरित कारवाई करावी .अन्यथा त्यासाठी तीव्र आंदोलन लवकरच छेडले जाईल .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने एका पत्रकाद्वारे देण्यात आला आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, श्री साईबाबा मंदीराचे आवारात श्री साईबाबांचे समकालीन, श्री साईबाबांबरोबर वावरले आणि बाबांची मनोभावे सेवा केलेले परमसाईभक्त नानावली, लक्ष्मीबाई कोते, अब्दुल बाबा व इतर यांच्या समाध्या आहेत.

आणि त्या परंपरागत श्री साईबाबा संस्थानकडे देखभालीकरीता आहे. तसेच त्यांचे कोणाचेही वारसदार त्यावर हक्क सांगत नाहीत किंवा त्याठिकाणी संस्थान देखभाल करते किंवा संस्थानचे हद्दीत येतात म्हणुन संस्थानकडेच त्याची जबाबदारी व हक्क आहेत.परंतु त्यापैकी अब्दुलबाबांची समाधीच काही वैयक्तिक इसमांकडे देण्यात आलेली आहे.

त्यावर येणारा साईभक्तांकडून दान केलेला पैसा हा त्या वैयक्तिक इसमांची खाजगी मालमत्ता असल्यासारखे ते त्या अब्दुलबाबांच्या समाधीवर साईभक्तांनी टाकलेल्या रोख दानावर हक्क प्रस्थापीत करुन स्वतःचे खिशात टाकतात. हे सर्वस्वी चुकीचे आहे.

अब्दुल बाबांच्या समाधीवर येणारे सर्व रोख दान हे संस्थानच्या पेटीत किंवा संस्थांनच्या ताब्यातच गेले पाहिजे व अब्दुल बाबांच्या समाधीची जबाबदारीही श्री साईबाबा संस्थानेच घेतली पाहिजे. यासाठी साई संस्थानने त्वरित लक्ष घालून संबंधित व्यक्तींना अब्दुलबाबांच्या समाधीवरुन बाजुला करुन त्या

अब्दुल बाबांच्या समाधीं ठिकाणी संस्थानचे कर्मचारी नियुक्त करणेत यावे.व ही कार्यवाही त्वरित करावी. अन्यथा आम्हाला त्याविरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल. असा इशारा या निवेदनातून सकल हिंदू समाजाच्या वतीने नितीन मोहनराव नवलपुरे, विठ्ठल चंद्रभान चौधरी ,नवनाथ पांडुरंग कोळगे ,आदींनी दिला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button