Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरक्राईम

कोपरगावत दोघांचा मृतदेह ,खून की आत्महत्या चर्चेला उधाण !

नाशिक जलसंपदा विभागाच्या गोदावरी डाव्या कालव्यातील पाण्यात कोपरगाव तालुक्यातील बोलकी शिवारात एक अंदाजे ५०-५५ वयाचे व मजबूत बांधा असलेल्या पुरुष जातीचे प्रेत वाहत आले असून या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तर आणखी दुसरी एक घटना संवत्सर शिवारात उघड झाली असून यात मयत सागर ज्ञानेश्वर सोनवणे (वय -३८) हा खीर्डी गणेश शिवारात रेल्वे लाईन कि.मि.४६६/११ ते ४६६/१३ दरम्यान मृत आढळून आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


याबाबत कोपरगाव तालुक्यात हा खून ही आत्महत्या याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी वाहत असून गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या दारणा आणि गंगापूर धरणातून सिंचनासाठी नाशिक जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांना पाणी दिले जाते.या तालुक्यात दोन गोदावरी कालवे असून मराठवाडा जलद कालव्याचा एक मोठा कालवा आहे

.सिंचनाचे अथवा बिगर सिंचनाचे पाणी आवर्तन सुटल्यावर बऱ्याच वेळा या ठिकाणी काही अकल्पित घटना घडून पोलिसांची डोकेदुखी वाढताना दिसत आहे.या शिवाय नगर-दौंड रेल्वेचा मार्ग तालुक्यात जात असून अनेक ठिकाणी अपघात अथवा घातपात होताना दिसत आहे.त्यात अनेकांचे बळी जात असतानाच्या घटना वारंवार होताना दिसत आहे.बोलकी आणि खिर्डि गणेश या ठिकाणी दोन घटना नुकत्याच उघड झाल्या आहे.

याबाबत पहिली घटनेबाबत अंचलगाव येथील पोलिस पाटील दादासाहेब मुरलीधर शिंदे (वय ५४)यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे की,”दिनाक १४ मार्च २०२५ रोजी रात्री १०.५३ वाजता गोदावरी कालव्याचे पात्रात पाईपलाईनला अडकलेले एक पुरुष जातीचे प्रेत आढळले असून त्याचे वय ५०-५५ असून तो शरीराने मजबूत बांध्याचा आहे.रंगाने काळा सावळा उंची ५.५ फूट आहे.

चेहरा गोल,नाक बसके,केस बारीक आहे.अंगात पांढरा रंगाचा शर्ट असून त्याच रंगाचा अंगात पायजमा आहे.याबाबत कोणाला काही माहिती असल्यास कोपरगाव तालुका पोलिस ठाणे यांचे दूरध्वनी क्रमांकावर ०२४२३-२२२२३३ संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी केले आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक अनुक्रमे -१८/२२/२०२४ भारतीय न्याय संहिता सन-२०२३चे कलम १९४ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.निजाम शेख हे करीत आहेत.

दरम्यान याबाबत आणखी दुसरी एक घटना संवत्सर शिवारात उघड झाली असून यात मयत सागर ज्ञानेश्वर सोनवणे (वय -३८) याने खीर्डी गणेश शिवारात रेल्वे लाईन कि.मि.४६६/११ ते ४६६/१३ दरम्यान मृत आढळून आला आहे.याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.याबाबत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोपरगाव तालुका पोलिसांना खबर दिली आहे.याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कुसारे हे करत आहेत

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button