Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
अ.नगरशिर्डी

तुमच्यात आज साईबाबा दिसले” – साईभक्तांचे अश्रूंनी भरलेले उद्गार समाधी मंदिरात साईभक्तांचे सोनं नाही, श्रद्धाच सापडली!

श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथील समाधी मंदिर परिसरात साईभक्तांसाठी पुन्हा एकदा “श्रद्धा आणि सबुरी”चा अनुभव देणारी हृदयस्पर्शी घटना घडली आहे. सुरक्षा विभागातील कर्तव्यदक्ष कर्मचारी श्री. संदीप धिवर यांना मंदिर परिसरात एक सोन्याचे ब्रेसलेट आढळून आले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी ते अत्यंत प्रामाणिकपणे तात्काळ सुरक्षा कार्यालयात जमा केले.

sai nirman
जाहिरात

सदर सोन्याच्या ब्रेसलेटचे वजन 11.390 ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत सुमारे 1 लाख 29 हजार रुपये इतकी आहे. सुरक्षा विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीनंतर हे ब्रेसलेट ईश्वर रामेश्वरम लड्डा, रा. बार्शी, जि. सोलापूर यांच्या कुटुंबीयांचे असल्याचे निष्पन्न झाले.

मंदिर परिसरात ब्रेसलेट हरवल्याचे लक्षात आल्यानंतर उपस्थित साईभक्तांनी संबंधित कुटुंबीयांना सुरक्षा कार्यालयात चौकशी करण्याचा सल्ला दिला. सुरक्षा कार्यालयात आल्यानंतर ब्रेसलेट सुरक्षितरीत्या सापडल्याची माहिती मिळताच कुटुंबीय भावूक झाले. त्यांनी सुरक्षा कर्मचारी श्री. संदीप धिवर यांच्याकडे पाहत उद्गार काढले,
“आज तुमच्यात आम्हाला साईबाबा दिसले. बाबांनी आमची श्रद्धा अढळ ठेवली.”

DN SPORTS

या घटनेमुळे श्री साईबाबा संस्थानमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांची प्रामाणिकता, कर्तव्यनिष्ठा आणि साईभक्तांप्रती असलेली निस्वार्थ सेवा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देणाऱ्या या अनुकरणीय कार्याबद्दल संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गाडीलकर साहेब तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. दराडे साहेब यांनी सुरक्षा कर्मचारी श्री. संदीप धिवर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

साईबाबांच्या पवित्र भूमीत आजही माणुसकी, प्रामाणिकपणा आणि भक्ती जिवंत असल्याचे हे प्रेरणादायी उदाहरण साईभक्तांच्या मनात श्रद्धेचा नवा विश्वास निर्माण करणारे ठरत आहे. 🙏

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button