Letest News
पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद
अ.नगरराजकीय

पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने साईबाबांच्या पूण्य भूमी शिर्डीत राष्ट्रवादीचे दोन दिवशीय पदाधिकारी शिबिर!

शिर्डी (प्रतिनिधी) 

sai nirman
जाहिरात

सन २०२५ या नवीन  वर्षभरात सामाजिक समता, विकासाच्या वेगवेगळ्या दिशा, पक्ष संघटन मजबूत करणे यासह इतर विषयांवर मंथन करण्याकरिता साईबाबांची पुण्यभूमी शिर्डी नगरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय पदाधिकारी शिबिर आज शनिवार पासून सुरू होत आहे.

DN SPORTS

kamlakar

या शिबिरास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार व राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.यावेळी प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले, साईबाबांच्या शिर्डी नगरीत बाबांचा आशीर्वाद मिळतो.

आत्मविश्वास ऊर्जा व मोठी प्रेरणा मिळते. लोकसभेत पक्षाला फारसे यश मिळाले नाही तेव्हा आमच्या पक्ष नेतृत्वाच्या क्षमतेबद्दल अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र त्यांना त्याचे उत्तर विधानसभेत मिळाले. विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने आम्हाला अभतपूर्व यश दिले आहे.


त्यामुळे आगामी काळात विकासाच्या वेगवेगळ्या योजना तसेच पक्ष संघटन यासह पाच वर्षाकरिता इतर विषयांवर मंथन होणे गरजेचे आहे. त्याकरिता शिर्डी येथे शिबिर घेतले आहे. संभाजीनगर येथे हे शिबिर होणार होते परंतु त्या ठिकाणी मर्यादित सदस्य संख्या ठेवली होती. त्यामध्ये अचानक वाढ झाल्याने व कार्यकर्त्यांचा आग्रह झाल्याने ऐनवेळी हे शिबिर शिर्डी येथे घेण्याचे ठरवले.


अधिवेशनासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, जेष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील, मंत्री धनंजय मुंडे, आजी-माजी आमदार, खासदार, सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तालुका अध्यक्ष संदीप सोनावणे आ. आशुतोष काळे, संग्राम कोते, अमित शेळके व जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या शिबिरासाठी व्यवस्था केले आहे.


बीड सरपंच हत्या प्रकरण संदर्भात सवाल विचारला असता गुन्हेगार व मास्टरमाइंड यांचा कसोशीने तपास होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, ही सुरुवातीपासून पक्षाची भूमिका आहे. त्यात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. मंत्री धनंजय मुंडे या शिबिरास उपस्थित राहतील, असा विश्वास सुद्धा यावेळी त्यांनी बोलून दाखविला.


उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते व राज्यभरातील प्रमुख नेते पक्षाचे मंत्री आमदार खासदार पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी ध्वजारोहण होईल, त्यानंतर शिबिरास प्रारंभ होणार आहे.


माजी मंत्री छगन भुजबळ या शिबिरास उपस्थित राहणार का? असा सवाल विचारला असता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, माजी मंत्री छगन भुजबळ पक्षातील ज्येष्ठ नेते असून पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. पक्षाच्या जडणघडणीत त्यांचा वाटा आहे. मी त्यांच्याशी स्वतः चर्चा केली व त्यांना शिर्डी येथील शिबिरास येण्याची विनंती केली आहे. ते या शिबिरास उपस्थित राहतील, अनेक जण शिर्डीला आले आहेत व काही येत आहेत. त्यामुळे हे शिबिर यशस्वीपणे संपूर्ण होईल. असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button