Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
क्राईमशिर्डी

शिर्डी बस स्थानकावर चालत्या बसला स्कुटी आडवी लावून बसचालकाला शिवीगाळ करत मोबाईलचे नुकसान करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने गुन्हा दाखल!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे एसटी बस ला स्कुटी आडवी लावून बसचालकाचा दरवाजा उघडून शिवीगाळ करत धक्काबुक्की करून व चालकाचा मोबाईल रस्त्यावर फेकत जीवे मारण्याची धमकी दिल्याने आरोपी राहुल बाळासाहेब नवले यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डी पोलीस ठाण्यात बस चालक रमेश भालचंद्र राठोड यांनी फिर्याद दिली आहे की, 17 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान मी व कंटक्टर आनंदा खंडोजी राठोड (बँच नं. 16886) रा. शिरपुर जि. धुळे असे शिर्डी ता. राहाता येथील बसस्थानकावरुन लाल रंगाची सरकारी एस.टी क्रमांक MH14 BT 2200 ही ताब्यात घेवुन शिर्डी ते शिरपुर असे जाण्यासाठी प्रवाशांसह शिर्डी बसस्थानकामधुन बसस्टॅण्ड आवारातुन बाहेर कोपरगांव रोडचे दिशेने घेवुन जात असतांना एका ग्रे रंगाचे स्कुटी क्रमांक MH01 CX 0846 या स्कुटीवरील इसम राहुल बाळासाहेब नवले रा. बेलापुर ता. श्रीरामपुर

हा मी चालवत असलेल्या एस.टी बसच्या समोर येऊन त्याने रोडवर त्याची स्कुटी आडवी लावुन रस्ता आडवुन मोठमोठ्याने शिवीगाळ करुन ड्रायव्हर साईडचा गाडीचा दरवाजा जोरजोरात ओढुन त्याने दरवाजावर चढुन खिडकीतुन आतमध्ये हात घालुन मी बस चालवत असताना माझ्या शर्टाची कॉलर धरुन धक्काबुक्की करुन मी पोलीस आहे. तुला पोलीस काय आहे हे दाखवतो, असे म्हणुन अंगावर धावुन आला व रागाने बघुन शिवीगाळ करुन जोरजोरात आरडाओरडा करत हातातील मोबाईल हिसकावुन तेथील रस्त्याचे मधील सिमेंटी डिव्हायडरवर जोरात फेकुन देवुन

मोबाईलचे नुकसान केले व तुम्हाला काय करायचे ते करा ,तुम्ही परत शिर्डीत दिसले तर तुमचा गेमच करुन टाकतो .अशी धमकी दिली व सरकारी कामामध्ये अडथळा आणला. अशा आशयाची फिर्याद रमेश भालचंद्र राठोड यांनी आरोपी राहुल बाळासाहेब नवले राहणार बेलापूर तालुका श्रीरामपूर यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात केली असून या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं. 25/भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 132 /126/( 2) 115 ( 2 )352/ 351/( 2) 324 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाँ पवार डी हे करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button