Letest News
शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर पुण्यातील साईभक्त रामदास तापकीर यांनी अर्पण केला १३ लाख ४२ हजार ९८० रुपये किंमतीचा ९० ग्रॅम सोन्याचा... शिर्डीचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अमोल विठ्ठलराव गंगलवाड चे टोकाचे पाऊल रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्... उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन अहिल्यानगर पोलिस दलात खळबळ! अमली पदार्थ विक्रीकांडात LCBचे माजी प्रमुख कबाडींना मॅटचा दणका नितीन गडकरी ॲक्शन मोडमध्ये- नगर–मनमाड महामार्गाच्या चौकशीसाठी केंद्रीय समिती‘ट्रंप तात्या डांबर देत ... राहता पोलिसांची दमदार कारवाई काल महिलेला लुटले आज चारही आरोपी ताब्यात! श्री साईबाबांच्या चरणी ११ लाख १९ हजार रुपयांचे हिरेजडित सोन्याचे ब्रोच अर्पण
अ.नगरराजकीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिपाडा कुटुंबाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले

उभे आयुष्य देशहितासाठी झिजवून तळागाळातील तसेच सर्वच स्तरातील घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. अशी प्रतिक्रिया डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी बोलताना व्यक्त केली. भारतीय संविधानचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिपाडा कुटुंबाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यावेळी माजी आमदार ओमप्रकाशजी पोखरणा, डॉ. राजेंद्र पिपाडा, महावीर पिपाडा, सचिन शिंदे आदि उपस्थित होते. संपूर्ण देशभर 6 डिसेंबर हा दिवस बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो.यावेळी पुढे बोलताना डॉ. पिपाडा म्हणाले की, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा संदेश आजच्या पिढीसाठी एक आदर्शच आहे. बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत असून त्यांची शिकवण अनेक पिढ्यांसाठी आदर्शवत असणार आहे. सवर्ण, शूद्र, उच्च आणि नीच अशी सामाजिक दरी भ्रूण काढत शिक्षणाचा समान हक्क मिळवून देण्याचा कायदा बाबासाहेबांनी आणला.

देशाला त्यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे आज अनेक मागास आणि वंचित घटकतील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळाला आहे. थोर समाजसुधारक म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांनी भारतातील तळागाळातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी खूप प्रयत्न केले. मागासवर्गाच्या हितांसाठी ‘स्वतंत्र मंजूर पक्ष’ या पक्षाची स्थापना केली होती. सप्टेंबर 1947 मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणू डॉ. आंबेडकरांनी शपथ घेतली.

सामाजिक भेदभाव निर्माण करणाऱ्या मनूस्मृति या ग्रंथाचे त्यांनी जाहीररीत्या दहन केले. तसेच नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये दीनदलितांना प्रवेश मिळवा म्हणून सत्याग्रह केला. तसेच महाडच्या चवदार तळ्यावर पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला. अशा या महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी वंदन करतो असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी उपस्थित माजी आमदार ओमप्रकाशजी पोखरणा, डॉ. राजेंद्र पिपाडा, महावीर पिपाडा, सचिन शिंदे आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button