Letest News
"छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष... रस्ता अडवल्याच्या कारणावरून रक्तरंजित हल्ला-बीअरच्या बाटल्यांनी दोघांना केले रक्तबंबाळ ३० दारू धंदे अभयात एकावरच कारवाई-मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई! मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड
अ.नगरराजकीय

maharashtra news:-तीन दिवस शाळांना सुट्टी?

Three days off for schools?

राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांनी तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळांमध्ये मतदान केंद्र असल्याने शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, अनेक शिक्षकांना निवडणूक कर्तव्यावर पाठवले जाणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यामुळं 18,19 आणि 20 नोव्हेंबर असे तीन दिवस शाळांना सुट्टी देण्यात येणार आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने आयुक्तांना दिले आहेत.

राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यानंतर लगेचच 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होत आहे. 20 नोव्हेंबरला मतदानसाठी शाळांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. तसंच, शिक्षकांचाही निवडणूक प्रक्रियेतील कामकाज आणि प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेत मोठा सहभाग असतो.

मतदानाची तयारी करण्यासाठी निवडणूक प्रशासन शाळा ताब्यात घेते. त्या पार्श्वभूमीवर 18,19 आणि 20 नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी देण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाने शिक्षण विभागाला सादर केला होता. या अनुषंगाने शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button