Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरक्राईम

पोलीस अधीक्षक राकेश ओला व सरकारी वकील अनिल ढगे यांचे विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत तक्रार दाखल

अहिल्यानगर –

sai nirman
जाहिरात

दि.३१ ऑक्टो. २४ रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील प्रमुख सरकारी साक्षीदार वळण ता. राहुरी येथील विजय मकासरे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी मा. जिल्हा न्यायालयाने अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी साक्षीदार मकासरे यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले होते.

DN SPORTS

kamlakar

तथापी जिल्हा न्यायालयाचे आदेश झाल्यानंतर पोलीस अधीक्षक ओला यांनी जिल्हा न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी विजय मकासरे यांना एक दिवस पोलीस संरक्षण दिले. व न्यायालयाला लेखी पत्र देऊन विजय मकासरे हे गुन्हेगार असल्याचे सांगून मकासरे यांची प्रतिमा मलीन केली

तसेच त्यांचेवर अनुक्रमे सात गुन्हे दाखल असल्याची खोटी माहिती देवुन त्यांचे चारित्र्य हनन केले. व मकासरे यांच्याबाबत जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील अनिल ढगे यांचे मार्फत सदरची खोटी माहिती न्यायालयासमोर सादर केली. व विजय मकासरे यांची न्यायालयात बदनामी घडवून आणली.


वास्तविक पाहता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मे न्यायालयात सादर केलेल्या पत्रातील मकासरे यांचेवरील काही गुन्हे न्यायालयाने निकाली काढले असून काही गुन्हे न्यायप्रविष्ठ असताना आणि मकासरे यांचे विरोधात कोणताही गुन्हा अद्याप शाबित होऊन त्यांना शिक्षा झाली नसताना त्यांचा गुन्हेगार असा उल्लेख करून निकाली निघालेल्या गुन्ह्यांची खोटी माहिती मे न्यायालयात सादर करून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी न्यायालयाची दिशाभूल केली आहे.


सरकारी वकील अनिल ढगे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या लेखी माहितीची कोणत्याही प्रकारे शहानिशा न करता ती माहिती न्यायालयासमोर सादर केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि सरकारी वकील अनिल ढगे यांनी मी अनुसूचित जातीचा असल्याचे माहित असतानाही संगणमताने मे न्यायालयासमोर माझी बदनामी करून व मे न्यायालयाला खोटी माहिती देऊन मला मानसिक त्रास दिला आहे.

असे विजय मकासरे यांनी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार न्यायालयाला खोटी माहिती देऊन मकासरे यांच्याबाबत न्यायालयाने दिलेले संरक्षण पुरविण्याचे आदेश रद्द करण्यास न्यायलयाला उद्युक्त केल्याबद्दल मकासरे यांनी उपरोक्त कायद्यातील तरतुदी अन्वये जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील अनिल ढगे यांचे विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी अंतर्गत ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे.


सदर तक्रारीच्या प्रती मकासरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, तसेच गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, व अनुसूचित जाती जमाती आयोग, समाज कल्याण संचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आदींना पाठविले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button