
संगमनेर ( प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे एका युवा संकल्प मेळाव्यामध्ये अध्यक्षस्थानी असणाऱ्या वसंत देशमुख यांनी सौ जयश्रीताई थोरात यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले. त्याचा संगमनेर तालुक्या बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील क्रांतिकारी रामोशी समाजाचे राज्यप्रतिनिधित्व करणाऱ्या नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या वतीने जाहीर निषेध
करण्यात येत असून येत्या निवडणुकीत संगमनेर तालुक्यात आ. बाळासाहेब थोरातांना पाठिंबा देत त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे संघटना उभी राहणार असल्याचे या संघटनेचे प्रांतअध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी म्हटले आहे.
वसंतराव चव्हाण यांनी पुढे म्हटले आहे की, पुरोगामी महाराष्ट्रा मध्ये महिला, मुलींविषयी सर्वत्र आदराचे स्थान आहे. मात्र धांदरफळ येथे वसंत देशमुख यांनी सभेत जे आक्षेपार्ह विधान केले .
हे राजकीय पुढाऱ्यांना शोभत नाही. अशा व्यक्तीचा आम्ही समस्त क्रांतिकारी रामोशी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करत असून सुसंस्कृत व निष्ठेने राजकारण करत असणाऱ्या माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, जयश्रीताई थोरात यांच्या पाठीमागे आम्ही यापूर्वी होतो. यापुढेही उभे राहणार आहोत, असे म्हटले असून संगमनेर येथील या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रातील नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ तीव्र निषेध व्यक्त करत आहेत.
त्याचप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर तालुक्यात नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचा आमदार बाळासाहेब थोरात यांना जाहीर पाठिंबा आहे. असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे. या पत्रकावर नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे राज्य प्रवक्ते देवराम गुळवे,
जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण, संजय शिरतार, बंडोपंत खर्डे गुरुजी, तानाजी शिरतार, राधाकिसन जेडगुले, साहेबराव गुरुकुले, संतोष शिरतार, रावसाहेब गुळवे, सुनील गुळवे, सिताराम जेडगुले, सुभाष जेडगुले, कैलास गोफणे, अजय येरमल, आदींसह संगमनेर तालुक्यातील व राज्यातील पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.