Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरशिर्डी

साईसंस्थान महिला सुरक्षा रक्षक बेबीताई नागरे यांनी सापडलेले सुमारे साडे सत्तावीस हजार रु. त्या साईभक्ताला केले परत!

शिर्डी ( प्रतिनिधी). आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान मध्ये असणाऱ्या कर्मचारी यांच्याकडून शिर्डीत संस्थान परिसरात साईभक्तांचे गहाळ झालेले, हरवलेले पाकीटे, दागिने प्रामाणिकपणे त्यांना परत केले जात असून ही परंपरा कौतुकास्पद आहे. असे साईभक्तांकडून आता बोलले जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिर्डीत आतापर्यंत अनेक साईभक्त यांचे पाकीट हरवली, दागिने गहाळ झाले. मात्र ते कर्मचाऱ्यांना स्वच्छता करताना किंवा इतरत्र सापडले असता त्यांनी ते प्रामाणिकपणे आपल्या अधिकाऱ्यांकडे जमा केले. अधिकाऱ्यांनी ओळख पटवून त्या साई भक्तांना ते प्रामाणिकपणे परत केले. अशा प्रामाणिकपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा साई संस्थांनच्या तर्फे सन्मानही करण्यात येतो.


दिनांक 28/10/2024. रोजीही शिर्डीत साईगुरुस्थान मंदिर परिसरात येथे ड्युटीला असणारी महिला सुरक्षा रक्षक श्रीमती बेबीताई नागरे यांना 27520/- रु सापडले. त्यांनी प्रामाणिकपणे संरक्षण ऑफिसला ते परत केले. ऑफिस मधील अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता ते पैसे साईभक्त शारदा शामसुंदर( चेन्नई) यांचे असल्याचे समजल्याने ते ओळख पटवून त्या साई भक्तांना परत केले.

बेबीताई नागरे ह्या अतिशय प्रामाणिक कर्मचारी आहेत. यापूर्वी देखील त्यांना वीस हजार रु. सापडले होते. त्यावेळीही त्यांनी ‌ते परत केले होते. त्या कोपरगाव वरून येजा करतात, वय झालेले आहे, परंतु आपली ड्युटी अतिशय प्रामाणिक करतात. अश्या प्रामाणिक कर्मचाऱ्यामुळे साईबाबा संस्थानचे भक्तांमध्ये नावलौकिक वाढते.

संस्थान कर्मचाऱ्यांचा हा प्रामाणिकपणा साई भक्तांद्वारे देशात परदेशातही पोहोचला जातो. अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा संस्थानही यथोचित सत्कार करून त्यांच्या प्रामाणिक पणाचे कौतुक केले जाते. श्रीमती बेबीताई नागरे यांचा ही साईसंस्थांन तर्फे सन्मान करून त्यांचे कौतुक होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button