Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
अ.नगरशिर्डी

श्री साईबाबा संस्‍थान प्रकाशित श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा श्री साई सभागृह येथे संपन्‍न झाला

श्री साईबाबा पुण्‍यतिथी (दसरा) उत्सवाच्या मुहुर्तावर श्री साईबाबा संस्‍थान प्रकाशित श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिकेचे श्री साईबाबा संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्‍के), मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, यांच्या हस्‍ते प्रकाशन सोहळा श्री साई सभागृह येथे संपन्‍न झाला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी प्रशासकीय अधिकारी तथा प्र उप मुख्‍य का‍र्यकारी अधिकारी सं‍दीपकुमार भोसले, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे, विश्‍वनाथ बजाज, मुख्‍यलेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व प्रकाशने विभागाच्‍या प्र. अधिक्षक सुनिता सोनवणे उपस्थित होते.


सन २०२५ ची श्री साई दैनंदिनी ही विशेष डिझाईन मध्ये बनविलेली आहे या दैनंदिनीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये असलेल्या क्यू आर कोड मध्ये मंदिर तसेच संस्थान चालवत असलेल्या विविध उपक्रमांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत.
श्री साई दैनंदिनी डीलक्स सहा प्रादेशिक भाषेत असून यात मराठी, हिंदी, तेलगू,तमिल, कन्नड, गुजराती या सर्व भाषांसह इंग्रजीत उपलब्‍ध असून

तीन प्रकारचे श्री साई दिनदर्शिका वॉल कॅलेंडर व टेबल कॅलेंडर विक्री करीता उपलब्‍ध आहेत. सर्व प्रकाशने साई भक्तांसाठी संस्थानचे मंदिर परिसरातील पुस्तके विक्री केंद्रावर लवकरच विक्री कामी वाजवी दरात उपलब्ध करण्यात येणार आहेत. ज्या साईभक्तांना श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिका खरेदी करावयाच्या आहेत त्यांनी संस्थानच्या संकेतस्थळावर online.sai.org.in नोंदणी करून दैनंदिनी व दिनदर्शिका २०२५ खरेदी कामीची

रक्कम पोस्टल चार्जेस सह online.sai.org.in या वेबसाईट द्वारे भरलेनंतर श्री साई दैनंदिनी व दिनदर्शिका पोस्टामार्फत पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहेत. संस्थान प्रकाशनांची विस्तृत माहिती www.sai.org.in व online.sai.org.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button