Letest News
राहता शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत-सोहेल-अनिकेतच्या कथित गुटखा विक्रीला कोणाचा वरदहस्त? सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांचा निलेश लंकेंकडून पराभव! हजारो लेकींच्या डोक्यावर मायेचा हात ठेवणाऱ्या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड शिर्डीच्या सामाजिक राज... दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता!
शिर्डी

मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण करणारसंस्थांनने ग्रामस्थ्यांचा अंत पाहू नये

श्री साईबाबा मंदिराचे चारही गेट खुले करणे,चारही गेट जवळ मोबाईल आणि चप्पल स्टँड असावे व चारही गेट जवळ सशुल्क दर्शन पास व्यवस्था व लाडू काऊंटर असावे या मागण्यांसाठी शिर्डी शहर व्यापारी संघटना व शिर्डी ग्रामस्थ यांच्यावतीने साईबाबा संस्थान प्रशासनास भव्य मोर्च्याद्वारे निवेदन देण्यात आले होते..
या मोर्च्याद्वारे सदर मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात साईबाबा संस्थान प्रशासनास १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता..परंतु अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही..शिर्डीकरांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण करण्यास साईबाबा संस्थान प्रशासन पुर्णपणे उदासीन आहे ही बाब यातून प्रकर्षाने दिसून येत असून शिर्डी परिसरामध्ये याबाबत प्रचंड असंतोष पसरलेला आहे..
यामुळे आपल्या मागण्या पूर्ण करण्याच्या हेतूने लवकरच साखळी उपोषणाचे नियोजन करण्यात येणार आहे..याबाबत
प्रशासनास आपल्या मागण्यांची आठवण करून देण्यासाठी सर्वांनी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी साहेब यांची भेट घेण्यासाठी उद्या
शनिवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ११ वाजता मारुती मंदिराजवळ उपस्थित रहावे ही विनंती..
समस्त शिर्डी व्यापारी संघटना व शिर्डी ग्रामस्थ यांनी केली आहे 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button