
शिर्डी येथील हॉटेल मध्ये काम करणाऱ्या दोघा तरुणांना भाजी बाजार येथे धरून कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्या कडील मोबाईल पैसे व चांदीच्या चैनीची लुटमार काही अट्टल गुन्हेगारांनी केली आहे ह्याबाबत शिर्डी पोलिसांनी आजून आरोपींना जेरबंद केले नसल्याची खात्रीशीर माहिती आहे घडलेल्या घटनेचा गुन्हा फिर्यादीने शिर्डी पोलिस स्टेशनला दाखल केला आहे .
पिंपळवाडी रोडवरील भाजी मंडई समोर असणाऱ्या साई सागर होटेलवर कामासाठी जात असलेल्या दोन तरुणांना येथे पाच ते सहा गुन्हेगारांनि त्यांना रस्त्यात अडवून त्यांच्याकडील मोबाईल,गळ्यातील चैन व रोख रक्कम लुटून हे गुन्हेगार पसार झाले आहेत हि घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मुद्देमाल हिसकावून नेल्याने फिर्यादी बिंदर लाला राजपूत याने दिली आहे त्यानुसार काही अनोळखी गुन्हेगारांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर 0455/2024 भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023 नुसार 309,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिस करीत आहेत शिर्डीत अश्या प्रकारे अश्या घटना होणे अत्यंत धोकादायक आहे आज ह्या गुन्हेगारांनी हॉटेल कर्मचारी यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटले आहे आणि जर अश्या आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई केली नाहीतर ह्या गुन्हेगारांचे मनोबल वाढून हेच गुन्हेगार साईभक्तांना लुटतील आधीच शिर्डीत गर्दी नसल्याने शिर्डीतील नागरिक हैराण झाले आहेत आणि अश्या घटना पुन्हा घडल्यास शिर्डीत येणारे साईभक्त भयभीत होतील अशी भावना जनमानसात झाली आहे