Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
राजकीयशिर्डी

श्री साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गदारोळ

श्री साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या नूतन कार्यालयासाठी जागा खरेदी करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या वतीने ठेवण्यात आला व या विषयावर माजी चेअरमन प्रताप कोते यांच्यासह काही सभासदांनी तीव्र हरकत घेत नवीन जागा खरेदी साठी मोठा खर्च येईल असे म्हणत संस्थेच्या मालकीच्या साई ज्योत इमारतीत सर्व काही व्यवस्था असून फक्त फर्निचर फीट करून किरकोळ खर्च करून अवघ्या पाच लाखात कार्यालय सुरू होईल असे म्हणत संस्थेच्या कार्यालयाच्या जागा खरेदी साठी तीव्र विरोध केल्याने मोठा गदारोळ झाला होता

sai nirman
जाहिरात

याबाबत चेअरमन विठ्ठल पवार यांनी संस्थेच्या स्थावर मालमत्तेत वाढ होईल तसेच शिर्डीच्या मध्यवर्ती ठिकाणी संस्थेचे कार्यालय सर्व सभासद आणि महिलांच्या दृष्टीने सोयीचे होईल असे म्हणत गेल्या 67 वर्षांपासून कार्यरत असलेल्या संस्थेचे स्वतःचे कार्यालय नाही असा युक्तिवाद मांडत असतांनाच नागपुरे नामक सभासदाने महिलांच्या दृष्टीने साई ज्योत इमारतीचा परिसर सुरक्षित नसून इमारतीच्या सभोवताली बार, परमिट रूम तसेच वाईन आणि बियर शॉपी असल्याने महिलांना अश्या ठिकाणी येताना असुरक्षितता वाटेल तसेच शहराच्या बाहेर असलेल्या संस्थेच्या कार्यालयात येण्या जाण्यासाठी मोठी अडचण होईल त्यामुळे संस्थेचे मध्यवर्ती ठिकाणी स्वतःचे कार्यालय असल्यास सर्वानाच सोयीचे होईल असा युक्तिवाद मांडला तसेच चार ते पाच सभासद वगळता इतर कोणीही जागा खरेदीसाठी विरोध दर्शविला नसल्याने विरोध करणाऱ्यांचा विरोध नोंदवून घेत इतर सर्व सभासदांच्या वतीने हा विषय मंजूर करण्यात आल्याचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी जाहीर केले

त्यानंतर देखील विरोध असणाऱ्यांनी सभासदांच्या सह्यांची मोहीम सुरू केल्याने अखेर विठ्ठल पवार यांनी सर्व संचालक मंडळाला सोबत घेत साई ज्योत इमारतीची पाहणी केली असता तिथे धक्कादायक प्रकार पाहावयास मिळाले तिथे उभ्या असलेल्या दोन इमरतींपैकी एक इमारत ही फक्त कॉलम आणि स्लॅब टाकलेले असून जवळपास 28 वर्ष या बांधकामाला झाल्याने अनेक ठिकाणी बांधकामातील लोखंड बाहेर आले असून सर्वत्र जुन्या वस्तू धूळ खात पडल्या आहेत तसेच दुसऱ्या इमारतीत 42 रूम काढले असून दर्शनी भागात लावलेली कोनशिला ही पहिल्या बांधकामाची असून दुसऱ्या इमारतीची कोनशिला च गायब असल्याचे दिसून आले असून तिथे टाकलेल्या वाळूच्या मागे ती दबली असावी अशी शक्यता संस्थेच्या सचिवांनी व्यक्त केली

DN SPORTS

मात्र संस्थेच्या मालकीची कोट्यावधींची मालमत्ता चक्क धूळ खात असलेली पाहून संचालक मंडळाला अक्षरशः धक्काच बसला तर पहिल्या इमारतीला पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी इंजिनियर ने जिनाच काढला नसल्याने तेथे तात्पुरता लोखंडी जिना बसवला असल्याने त्याबद्दल देखील संचालक मंडळाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर चेअरमन विठ्ठल पवार यांनी सचिव नबाजी डांगे यांना कार्यालयासाठी प्रस्तावित जागा कुठे आहे याबाबत विचारले असता त्यांनी या दोन्ही इमारतींच्या प्लॅनमध्ये कार्यालयासाठी जागाच दर्शविली नसल्याचे सांगितल्याने विठ्ठल पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधत सभासदांची दिशाभूल कोण करतंय हे आता स्वतः सभासदांनी प्रत्यक्षात साई ज्योत इमारतीच्या ठिकाणीं येऊन पहावे आणि ठरवावे तसेच रस्त्यावरून इमारतीपर्यंत येण्यासाठी रस्ता सुस्थितीत नाही तसेच इमारतीच्या आजूबाजूला मोठ मोठे खड्डे पडले असून तेथे प्रथमतः भर टाकावी लागणार आहे आणि त्यासाठीच पाच लाखांपेक्षा जास्त खर्च येईल..असे असताना आमच्या मित्रांनी पाच लाखात कार्यालय सुरू होईल असे म्हटले असून जवळपास 2023 पर्यंत यांचीच सत्ता होती मग यांना रोखल कोणी होत कार्यालय थाटण्यासाठी असा सवाल करत ही सभासदांच्या मालकीची इमारत असून याठिकाणी प्रत्यक्ष येऊन पाहा अणि कोण दिशाभूल करतंय ते ठरवा असे आवाहन चेअरमन विठ्ठल पवार यांनी केलेय

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button