Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
Blog

कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्य धंदे करणारे लोकांविरुध्द धडक कार्यवाही!

कोपरगाव (प्रतिनिधी)कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्य धंदे करणारे लोकांविरुध्द धडक कार्यवाही करुन
21820 /- रुपये किंमतीची देशी विदेशी दारू सह इतर साहित्य, मुद्देमाल जप्त करुन कोपरगाव पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत मोठी कारवाई केली असून कोपरगाव पोलिसांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम, शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी मा. श्री संदीप मिटके, यांनी दिलेले आदेश व
सुचनांनुसार कोपरगावचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे पोलीस स्टेशन हददीतील अवैद्य धंदयाविरुध्द धडक कार्यवाही करीत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हददीमध्ये 11/12/2023
रोजी 19:20 वा. सुमारास कासली गावात शिरसगाव रोडच्या कडेला आराध्या पान स्टॉलचे पत्र्याचे आडोशाला ऋषिकेश मनोहर जमदाडे (वय 32वर्षे) रा. कासली ता. कोपरगाव हा विनापरवाना बेकायदा 4120
रुपयांचे देशी व विदेशी दारु चोरुन विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगताना मिळुन आला आहे. याबाबत
त्याचेविरुध्द कोपरगाव ता पो.स्टे. गु.र.नं. 581/2023 म.प्रो. ॲ.क. 65(ई) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
तसेच दिनांक 11/12/2023 रोजी 20:55 वा. सुमारास शिरसगाव शिवारात गोधेगाव रोडच्या कडेला एस पी पान
स्टॉलच्या पत्र्याच्या आडोशाला रविंद्र छगन गायकवाड वय 28 वर्षे रा. शिंगणापूर ता. कोपरगाव हाविना परवाना बेकायदा 17700 रुपयांची देशी व विदेशी दारु जवळ बाळगताना मिळुन आला आहे. याबाबत
त्याचेविरुध्द कोपरगाव ता.पो.स्टे. गु.र.नं. 582/2023 म.प्रो. ॲ.क. 65 (ई) प्रमाणे दाखल करण्यात आला असुन
अशा प्रकारे अवैद्य धंद्याविरुध्द केसेस दाखल करुन एकुण 21,820 रुपयांचा माल हस्तगत केला आहे. सदर
गुन्ह्याचे तपास पोहेकॉ निजाम शेख हे करीत आहे.


सदरची कौतुकास्पद कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री राकेश ओला,अति. पोलीस अधीक्षक मा.श्रीमती स्वाती
भोर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके
यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गागरे,
पो.कॉ. रोहित आरवडे, पो.कॉ चंद्रकांत मेढे, पोकॉ राजु शेख यांचे पथकाने केली आहे. अधिक तपास कोपरगाव पोलीस करत आहेत.

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button