Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
Blog

जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगता सौरऊर्जा प्रकल्प रद्द व्हावा अन्यथा अमरण उपोषण—- कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य

शिर्डी ( प्रतिनिधी)जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प होऊ नये म्हणून मच्छीमार संघटना, ट्रस्ट,पंच सामाजिक संस्था यांच्या वतीने तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले की, संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यातील पैठण गंगापूर नेवासा शेवगाव या तालुक्यातील पण पसारा परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्प तयार करण्याची पूर्ण तयारी झाली असून वित्तमंत्री व केंद्रीय मंत्री भागवतजी कराड साहेब यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प होताना दिसत आहे त्यामुळे पशु पक्षी, पर्यटन व मच्छिमार तसेच जैविक विविधतेवर मोठा परिणाम होणार असून शासनाने हा प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावा यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर निवेदन देण्यात आले आहे. येत्या सात डिसेंबर रोजी नेवासा तहसील कार्यालय व पैठण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सामूहिक मच्छिमार समाज यांच्यावतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे .यासंदर्भात सर्व विभागीय कार्यालयांना निवेदन दिले असून तातडीने प्रकल्प रद्द न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय व पाटबंधारे विभाग कार्यालय दिल्ली येथील प्रधानमंत्री कार्यालय राष्ट्रपती कार्यालय सर्व कार्यालयांना राज्य आणि केंद्रातील सर्व मंत्रालयांना लेखी निवेदन देऊन ‌तसे कळविले असून शासनाच्या व प्रशासनाच्या वतीने तातडीने निर्णय घेण्यात यावे व सात तारखेच्या आत लेखी स्वरूपात संबंधित संस्था ट्रस्ट कमिटी पंच यांच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात यावे, असे न झाल्यास सात तारखेला दुपारी बारा वाजता सामूहिक अमरण उपोषण करणार आहेत यामध्ये अनुचित प्रकार घडल्यास याला शासन प्रशासन सरकार जबाबदार राहील. असे कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button