Letest News
७५ हजारांच्या सोन्याच्या मंगळसूत्राचा मोह टाळला! तासाला अवघे ७० रुपये कमावणाऱ्या शिर्डीच्या संतोष मो... उच्च न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप तात्पुरता स्थगित! जिल्ह्यातील पाच गुटखा विक्रेत्यांवर एलसीबीचे छापे! मग बड्या कथित पुरवठादारांना अभय कोणाचे? बंगालच्या साईभक्ताने अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी साई आश्रयातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलला आ... साई मंदिरात नावाचा खेळ! शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या नावाने एक्झिट गेटमधून प्रवेश साईचरणी तब्बल ९४ लाख ८६ हजारांचे सुवर्ण-रजत घड्याळ अर्पण! राहता शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत-सोहेल-अनिकेतच्या कथित गुटखा विक्रीला कोणाचा वरदहस्त? सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांचा निलेश लंकेंकडून पराभव! हजारो लेकींच्या डोक्यावर मायेचा हात ठेवणाऱ्या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड शिर्डीच्या सामाजिक राज... दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा
राजकीयशिर्डी

७५ हजारांच्या सोन्याच्या मंगळसूत्राचा मोह टाळला! तासाला अवघे ७० रुपये कमावणाऱ्या शिर्डीच्या संतोष मोरे यांचा प्रामाणिकपणाचा आदर्श

शिर्डी | प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

शिर्डी नगरीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो साईभक्त येत असतात. या साईभक्तांची सेवा करणे हीच साईबाबांची खरी सेवा मानणाऱ्या शिर्डीतील एका सामान्य कामगाराने आपल्या असामान्य प्रामाणिकपणातून माणुसकीचा सुंदर आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

द्वारकामाई मंदिराजवळील श्री साई चैतन्य दुकानासमोर काम करणारे शिर्डी येथील रहिवासी श्री. संतोष पर्वत मोरे यांना आज एक सोन्याचे मंगळसूत्र आढळून आले. या मंगळसूत्राचे वजन सुमारे ५ ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत ७५ हजार रुपये होती. मात्र, एवढ्या किमतीचा सोन्याचा दागिना सापडल्यानंतरही त्यांनी क्षणाचाही मोह न ठेवता तो तातडीने साईबाबा संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केला.

DN SPORTS

kamlakar

दरम्यान, सुरत येथील साईभक्त श्रीमती हेमंती आशिष शर्मा यांचे मंगळसूत्र हरविल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्या शोध घेत साईबाबा संस्थानच्या संरक्षण कार्यालयात पोहोचल्या. आवश्यक ओळख पटविल्यानंतर संतोष मोरे यांच्या हस्ते त्यांचे हरवलेले सोन्याचे मंगळसूत्र त्यांना परत करण्यात आले. आपला मौल्यवान दागिना सुखरूप परत मिळाल्याने त्यांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू तरळले.

मंगळसूत्र हरविणे हा अपशकुन मानला जातो; मात्र साईबाबांनीच आपले मंगळसूत्र पुन्हा मिळवून देत शुभशकुन केला, अशी भावनिक भावना श्रीमती शर्मा यांनी व्यक्त केली.

तासाला ७० रुपये कमाई; पण प्रामाणिकपणाची किंमत अनमोल!

विशेष म्हणजे, संतोष मोरे यांच्यासारखे अनेक शिर्डीतील ग्रामस्थ अवघ्या ७० रुपये प्रतितास या मोबदल्यावर काम करतात. दिवसाची मेहनत करून उदरनिर्वाह करणाऱ्या या सामान्य कामगाराने ७५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्याचा मोह न करता तो प्रामाणिकपणे परत केला. पैशापेक्षा माणुसकी आणि प्रामाणिकपणा मोठा असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

साईभक्तांची सेवा करणे हीच साईबाबांची खरी सेवा आहे, या भावनेतून आपण हे काम केले, असे संतोष मोरे मानतात.

पोलीस प्रशासनाकडून प्रामाणिकपणाचा गौरव!

संतोष मोरे यांच्या या प्रामाणिक आणि कौतुकास्पद कार्याची दखल घेत शिर्डी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मा. श्री. रणजित गलांडे आणि पोलीस उपनिरीक्षक श्री. सागर काळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना केवळ दर्शनाचा आनंदच नव्हे, तर माणुसकी, विश्वास आणि प्रामाणिकपणाचा अनुभवही मिळतो, हे संतोष मोरे यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. साईबाबांच्या नगरीतील खरा हिरा सोन्यात नसतो, तर तो अशा प्रामाणिक माणसांच्या मनात असतो!

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button