श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अपार श्रद्धा आहे. श्रद्धा आणि भक्तिभावाने साईभक्त श्री साईचरणी विविध स्वरूपात दान अर्पण करीत असतात.
याच भक्तिभावातून नागपूर येथील साईभक्त श्री. अभिजीत वडनेरे यांनी ४ लाख ५६ हजार ०५७ रुपये किंमतीचा, ३२ ग्रॅम ८५० मिलीग्रॅम वजनाचा, आकर्षक ‘ॐ’ अक्षराच्या आकारातील सोन्याचा ब्रोच श्री साईचरणी अर्पण केला.
यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्त श्री. अभिजीत वडनेरे यांचा सत्कार केला.

DN SPORTS
जाहिरात