मालेगाव कॅम्प | प्रतिनिधी
जय महाकाली मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्याच्या नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. यानिमित्त मंडळाची जाहीर बैठक रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक शिवानंद चौक, मल्लूशेठ बंगला, मालेगाव कॅम्प येथे होणार असून, नवरात्रोत्सवाच्या आयोजनासह विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन बैठकीत करण्यात येणार आहे.

मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह भक्तांनी बैठकीस वेळेवर उपस्थित राहून नवरात्रोत्सवाच्या नियोजनात सहभागी व्हावे, असे आवाहन जय महाकाली मित्र मंडळाचे संस्थापक श्री. विजय रामन्ना गवळी यांनी केले आहे.
: भक्तीमय नवरात्रोत्सवासाठी जय्यत तयारी
दरवर्षी उत्साहात साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदाही जय महाकाली मित्र मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानस आहे. त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भक्तांच्या सहभागातून नियोजन करण्यात येणार आहे.