Letest News
शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर पुण्यातील साईभक्त रामदास तापकीर यांनी अर्पण केला १३ लाख ४२ हजार ९८० रुपये किंमतीचा ९० ग्रॅम सोन्याचा... शिर्डीचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अमोल विठ्ठलराव गंगलवाड चे टोकाचे पाऊल रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्... उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन अहिल्यानगर पोलिस दलात खळबळ! अमली पदार्थ विक्रीकांडात LCBचे माजी प्रमुख कबाडींना मॅटचा दणका नितीन गडकरी ॲक्शन मोडमध्ये- नगर–मनमाड महामार्गाच्या चौकशीसाठी केंद्रीय समिती‘ट्रंप तात्या डांबर देत ... राहता पोलिसांची दमदार कारवाई काल महिलेला लुटले आज चारही आरोपी ताब्यात! श्री साईबाबांच्या चरणी ११ लाख १९ हजार रुपयांचे हिरेजडित सोन्याचे ब्रोच अर्पण
राजकीयशिर्डी

तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्याला दोन आमदार आहेत, सत्तेचा आणि राजकीय ताकदीचा गाजावाजा आहे; मात्र सामान्य नागरिकांना सुरक्षित आणि दमदार रस्ता देण्यात दोन्ही आमदार अपयशी ठरल्याचा संतप्त सवाल आता थेट फलकावर झळकला आहे. “तालुक्याला दोन आमदार पण; एकही नाही दमदार” या एका वाक्याने कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून सुरू असलेल्या संतापाला शब्द मिळाले असून, हा फलक सध्या कोपरगावसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
रांजणगाव देशमुख येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुनील वर्पे यांनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने झगडेफाटा-वडगाव पान मार्गालगत हा फलक लावून तालुक्यातील राजकीय नेत्यांना जणू त्यांच्या कामगिरीचा आरसाच दाखवला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


फलकावरील मजकूरही तितकाच बोलका आणि बोचरा आहे—
“तालुक्याला २ आमदार पण… तालुक्याला जायला एक पण रस्ता नाही दमदार!”
“तालुक्याला डबल आमदार पण… गावचा साठवण तलावाची क्षमता निम्यात!”
“२ आमदार पण… रोज रात्री लाईट जाते २ तास!”
या काही ओळींनी कोपरगाव तालुक्यातील विकासाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिकांचा जीव मात्र रोज धोक्यात!
कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था आता नागरिकांसाठी नवीन राहिलेली नाही. मात्र, वारंवार होणाऱ्या आंदोलनांनंतर, निवेदनांनंतर आणि अपघातांनंतरही परिस्थिती बदलत नसल्याने नागरिकांची संवेदनशीलताच बोथट झाली असल्याची खंत व्यक्त होत आहे.


अहिल्यानगर-कोपरगाव महामार्गाचे वर्षानुवर्षे रखडलेले काम, अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे, निकृष्ट दर्जाची कामे आणि प्रशासनाचा संथ कारभार यामुळे नागरिकांसह शिर्डीकडे जाणाऱ्या लाखो साईभक्तांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
१५ ते २० वर्षांपासून या भागातील महत्त्वाच्या रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याचा आरोप नागरिकांकडून सातत्याने केला जात आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचते, वाहने अडकतात, वाहतूक कोंडी होते आणि अपघातांचे प्रमाण वाढते. मात्र, नागरिकांच्या जीवापेक्षा आश्वासनांची किंमत जास्त असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका होत आहे.
७ कोटींचा रस्ता अडीच वर्षांत खचला; दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह
श्रीसाईबाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशनदरम्यान सुमारे ७ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या चौपदरी रस्त्याची अवस्था अवघ्या अडीच-तीन वर्षांतच खराब झाल्याचा आरोप होत आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी साईड गटारीच्या स्लॅबचे ढेकळे हाताने निघत असल्याचे दाखवून दिल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


साईबाबा कॉर्नर ते संजीवनी कारखाना मार्गावरील कामांबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
झगडेफाटा ते वडगाव पान, संजीवनी कारखाना ते संवत्सर, टाकळी फाटा ते धामोरी, कोपरगाव-वैजापूर जुना मार्ग आदी रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत.
अरुंद रस्ते, धोकादायक वळणे आणि खड्ड्यांचे जाळे यामुळे सातत्याने लहान-मोठे अपघात होत असून, काही नागरिकांना जीवही गमवावा लागला आहे.


चार दिवस काम… सहा महिने बंद! तब्बल २६ वर्षांचा विकासाचा ‘रेकॉर्ड’
या भागातील रस्त्यांची अवस्था पाहता “चार दिवस काम सुरू राहते आणि सहा महिने बंद पडते” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. गेल्या तब्बल २६ वर्षांपासून अनेक महत्त्वाच्या रस्त्यांबाबत हाच अनुभव असल्याची चर्चा आहे.
शिर्डीतील उत्सव काळात वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी प्रशासनाकडून झगडेफाटा ते वडगाव पान या मार्गावर वाहतूक वळविण्यात येते. मात्र, इतक्या वर्षांपासून हा मार्ग पर्यायी वाहतुकीसाठी वापरला जात असूनही त्याच्या दर्जेदार विकासासाठी पुरेशी तरतूद का करण्यात आली नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
“हा पराक्रम तर थेट वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवायला हवा,” असा उपरोधिक टोला नागरिकांकडून लगावला जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button