Letest News
‘टक्केवारी कुणी मागितली?’ ते ‘ट्रम्पमुळे डांबर मिळत नाही!’ नगर–मनमाड रस्त्यावर राजकारण तापले श्रीरामपुरात जेधे–बेग टोळीवर कायद्याचा दणका!खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात बीएनएस कलम १११चा वापर बंटी लहामगे फरार- पण गुटखा तस्करी जोमात ‘त्या’ नेटवर्कला कोणाचा वरदहस्त? गुन्हा दाखल असताना आरोपी रा... श्री साई पारायण तीर्थयात्रा-२०२६; काशी-अयोध्येसह पशुपतीनाथ दर्शनाची सुवर्णसंधी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले साई समाधीचे मनोभावे दर्शन शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रेशनचा तांदूळ बोबडे आणि पवार काळ्या बाजारात नेतो! गोर - गरीबांच्या मुखातील  अन्न कसा हिरावून घेतो !! सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई मंदिरात सापडली ४८ हजारांची सोन्याची अंगठी-कर्तव्य बजावताना सापडली सोन्याची अंगठी लक्ष्मण घोरपडें... राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात
अ.नगरक्राईम

श्रीरामपुरात जेधे–बेग टोळीवर कायद्याचा दणका!खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात बीएनएस कलम १११चा वापर

श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारी विश्वाला हादरा देणारी मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे. खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात गोरख ऊर्फ विजय मुन्ना जेधे व जयप्रकाश ऊर्फ सोन्या अशोक बेग यांच्यासह चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १११ अंतर्गत संघटित गुन्हेगारीची वाढीव कारवाई करण्यात आली आहे. दोन विधीसंघर्षीत बालकांचाही या प्रकरणात सहभाग निष्पन्न झाला आहे.
दि. २१ जानेवारी २०२५ रोजी कृष्णविहार प्लॉटिंग, इंदिरानगर परिसरात शाहरुख आयुब पठाण याच्यावर चॉपर व चाकूने वार करून तसेच पिस्तुलातून गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर प्रकार घडला होता. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८/२०२५ अन्वये BNS कलम १०९, ४९, ३(५) तसेच आर्म्स अॅक्ट कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


गुन्हेगारी अभिलेखाची पडताळणी; टोळीवर १११चा शिक्का
या प्रकरणातील गोरख ऊर्फ विजय मुन्ना जेधे (३३), मनोज संजय साबळे (२३), जयप्रकाश ऊर्फ सोन्या अशोक बेग (४१) आणि अंकुश रमेश जेधे यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहरासह इतर पोलीस ठाण्यांमध्ये विविध गंभीर व दखलपात्र गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
आर्थिक व भौतिक फायद्यासाठी संघटित टोळी तयार करून गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी या टोळीविरुद्ध BNS कलम १११ची कठोर तरतूद लागू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला. मंजुरी मिळाल्यानंतर मूळ गुन्ह्यात कलम १११ वाढविण्यात आले.


खुनाच्या प्रयत्नापासून दरोड्याच्या तयारीपर्यंत गुन्ह्यांचा आरोप
पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित आरोपी व त्यांच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्रांचा वापर, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे, चोरी, अपहरण, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, गंभीर दुखापत आणि शासकीय कामात अडथळा यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपींच्या गुन्हेगारी अभिलेखाची पडताळणी करून संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर कायदेशीर पाऊल उचलले आहे.


‘मोक्का’ नव्हे; मोक्कासदृश कठोर तरतुदीचा कायदेशीर दणका
BNS कलम १११ ही संघटित गुन्हेगारीविरोधातील कठोर तरतूद आहे. त्यामुळे या कारवाईकडे श्रीरामपूर शहरातील संघटित गुन्हेगारीविरोधातील महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. दोष सिद्ध झाल्यास या कलमांतर्गत कठोर शिक्षेची तरतूद आहे.
श्रीरामपूर शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी टोळ्यांना कायद्याचा धाक दाखविण्याचा स्पष्ट संदेश गेला असून, शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल खैरे व पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम यांच्या पथकाने केली.
याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.”

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button