Letest News
दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली
क्राईमशिर्डी

दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

शिर्डी (प्रतिनिधी) : राहाता तालुक्यातील निमगाव येथे चोरट्यांनी पुन्हा एकदा धाडसी कृत्य करत दिवसाढवळ्या घरफोडी केली. घराचे मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील लॉकर फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले. या घटनेमुळे निमगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश भाऊसाहेब गाडेकर (रा. निमगाव, ता. राहाता) यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे श्री साईबाबा संस्थानमध्ये नोकरीस असून, त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरावर पाळत ठेवून ही चोरी केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाट उघडून लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने लबाडीच्या उद्देशाने चोरून नेले. चोरीस गेलेल्या मालाची किंमत सुमारे ₹४ हजार असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ अन्वये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक गलांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दातीर करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांची हालचाल तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.


गेल्या काही दिवसांपासून शिर्डी व राहाता तालुक्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी घर बंद ठेवताना अधिक खबरदारी घ्यावी, तसेच संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button