Letest News
शिर्डीत दिवसाढवळ्या धर्मशाळेची भिंत जमीनदोस्त शिवसेना पदाधिकाऱ्यासह ५ जणांवर गुन्हा संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई AI चा गैरवापर की राजकीय कट? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाने मॉर्फ ऑडिओ-व्हिडिओ प्रकरण-संगम... शरीरात घुसला चक्क बॉलपेन- श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ व जीवघेण्या शस्त्रक्रियेला यश शिर्डीतील महिला हत्येनंतर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची काव्यात्मक टीका-सोशल मीडियावर चर्चेला उध... शिर्डीच्या भूमिपुत्री डॉ. सिमरन साई कोतकर यांची वारकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा-सर्वत्र कौतुकाचा वर्षाव शिर्डी पोलिसांचा गुटखा माफियांवर धडक प्रहार! दोन ठिकाणी एकाच वेळी छापे दोघे ताब्यात हजारो रुपयांचा ग... साई समाधीवरील चित्रीकरण प्रकरण पेटले- सखोल चौकशीसह फोटो एडिट करून विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ... महिलेचा खळबळजनक आरोप-बलात्कार-पिस्तुलाचा धाक जीवे मारण्याच्या धमक्या शिर्डी पोलिसांत मध्यरात्री FIR जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन
क्राईमशिर्डी

शिर्डीत दिवसाढवळ्या धर्मशाळेची भिंत जमीनदोस्त शिवसेना पदाधिकाऱ्यासह ५ जणांवर गुन्हा

शिर्डी | प्रतिनिधी
साईनगरी शिर्डीत दिवसाढवळ्या एका धर्मशाळेच्या मालकीच्या जागेत घुसून भिंत पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काशी अन्नपूर्णा धर्मशाळेच्या आवारातील अंदाजे ७ ते ८ फूट भिंत टिकाव व लोखंडी गजाच्या सहाय्याने पाडून नुकसान केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी शिवसेना पदाधिकारी विजय सोपानराव जगताप यांच्यासह ४ ते ५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


धर्मशाळेचे व्यवस्थापक विश्वास वसंतराव पेकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि. २१ जुलै) सकाळी सुमारे ११ वाजता काही जण धर्मशाळेची भिंत पाडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी संबंधित व्यक्ती मालकीच्या जागेत अनधिकृतपणे प्रवेश करून भिंत पाडत असल्याचे त्यांनी पाहिल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.


फिर्यादीने जाब विचारल्यानंतर “मीच भिंत पाडायला सांगितली आहे. तुम्ही यात पडू नका, येथून निघून जा,” असे विजय जगताप यांनी सांगितल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र पोलिस घटनास्थळी पोहोचताच संबंधितांनी तेथून पलायन केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर शिर्डी पोलीस ठाण्यात FIR क्रमांक ०६४४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२४ व ३३२(c) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button