Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
Blog

दहावी बोर्डाचा निकाल जाहीर

2023- 2024 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या शालान्त परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra SSC 10th Results) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी राज्यातील हा निकाल जाहीर केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिक्षण मंडळाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्याचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला. यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षेमध्ये दमदार कामगिरी करत कोकणातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली. कोकण विभागाच्या यंदाच्या निकालाची आकडेवारी आहे 99.01 टक्के. शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार या वर्षीसुद्धा निकालावर मुलींचच वर्चस्व पाहायला मिळालं.

यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळानं एटीकेटीची तरतूद केली आहे. ज्यामुळं अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचं एक वर्ष व्यर्थ जाणार नाहीय. दहावीच्या एखाद्या विद्यार्थ्याला एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण होता आलं नाही तरीही ते विद्यार्थी इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र असतील.

यंदाच्या वर्षी जून महिन्यात त्या विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश घेता येणार आहे. पण, अकरावीचा अंतिम निकाल लागण्याआधी विद्यार्थ्यानं दहावीच्या अनुत्तीर्ण विषयांची परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण होणं अपेक्षित असेल.

शालेय शिक्षण मंडळाच्या या सुविधेमुळं यंदा 26 हजार विद्यार्थ्यांना एटीकेटीचा लाभ घेता येणार असल्याची माहिती जारी करण्यात आली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button