Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
Blog

प्रभाग क्र. ०१ साठी विकासाभिमुख नेतृत्व; जगदिश तुकाराम गोऱ्हे यांची नगरसेवक पदासाठी तयारी

मालेगाव | प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

मालेगाव महानगरातील सामाजिक, सांस्कृतिक व जनसेवेच्या कार्यात सातत्याने सक्रिय असलेले जगदिश तुकाराम गोऱ्हे हे आगामी मालेगाव महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ०१ मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या विचारसरणीनुसार समाजहिताचे कार्य केले आहे.

लहानपणापासून समाजसेवेची आवड असलेल्या जगदिश गोऱ्हे यांनी सन २०१७ पासून भारतीय जनता पक्षाशी सक्रिय सहभाग नोंदवला. “सबका साथ, सबका विकास” या धोरणाने प्रेरित होऊन त्यांनी सामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर लक्ष केंद्रित करत काम केले आहे. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची समस्या, स्वच्छतेचा अभाव, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, महिलांची सुरक्षितता तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा यांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.

DN SPORTS

भारतीय जनता पार्टी तसेच वंदे मातरम् संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहिमा, गरजूंसाठी मदतकार्य, युवक मार्गदर्शन तसेच सामाजिक ऐक्य वाढवणाऱ्या उपक्रमांमुळे ते नागरिकांच्या संपर्कात राहिले आहेत.

यापुढील काळात प्रभाग क्रमांक ०१ चा सर्वांगीण विकास साधणे, मूलभूत सुविधा सक्षम करणे, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन देणे आणि प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नाला न्याय मिळवून देणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे जगदिश गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे. प्रभागाचा दर्जा उंचावून तो आदर्श प्रभाग बनवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

नागरिकांचा विश्वास, साथ आणि आशीर्वाद हीच खरी ताकद असल्याचे सांगत
“प्रभाग क्र. ०१ चा विकास… हाच माझा ध्यास!”
असा ठाम संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.


प्रभाग क्र. ०१
मालेगाव महानगरपालिका, मालेगाव

जगदिश तुकाराम गोऱ्हे

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button