Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
Blog

जपान येथून आलेल्या भाविकांचे द्वारकामाई जवळ चोरट्याने लांबविले तब्बल सव्वा लाख रुपये

शिर्डीत साई बाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखोंच्या संख्येने साई भक्त शिर्डीत येत असतात त्यात विविध देशांतील भाविक साई चरणी नतमस्तक होत साईबाबांचे आशीर्वाद घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण करून घेतात मात्र या भाविकांच्या सोबतच काही चोर पाकीट मार सुद्धा शिर्डीत येत भाविकांच्या पाकिटांवर डोळा ठेवत हात सफाई करत भाविकांच्या खिशाला चटका देत असतात मात्र गुरुवारी बाबांच्या पालखीचा दिवस होता आणि गर्दी असल्याने काही संधीसाधू सुद्धा या गर्दीत फिरत असणार त्यातच जपान देशातून आलेल्या काही भाविकांमध्ये एका महिला भाविकाची पैशांची पर्स द्वारकामाई समोर गर्दीत कोण्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने जपान देशातून आलेल्या या महिला भाविकांच्या पर्स मधील तब्बल सव्वा लाखांची रोकड लंपास झाली. काही वेळाने दुकानात खरेदी करण्यासाठी हे भाविक गेले असता त्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी याबाबत आपल्या सहकाऱ्यांना सांगितले व रात्री उशीर झालं असल्याने त्यांनी शुक्रवारी शिर्डी पोलिस स्टेशनला जात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 1066 प्रमाणे भारतीय दंड विधान कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी सुद्धा या भाविकांना जलद आणि योग्य दिशेने तपास करत पैसे परत मिळवून देण्याचे प्रयत्न करू असे आश्वासित केल्याचे भाविकांनी संगितीले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

गेल्या काही महिन्यांपासून विदेशी भाविकांची संख्या शिर्डीत साई दर्शनासाठी वाढली असून नुकतेच युरोपातील जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्‍ट्रीया, रशीया व डेन्‍मार्क या देशांतील ३७ महिला व १५ पुरुष असे एकुण ५२ परदेशी साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या माध्‍यान्‍ह आरतीस उपस्थित राहून श्रींचे समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर नेपाळ येथील 70 साई भक्तांनी साई दर्शन घेतले व त्यानंतर अमेरिकेतील जेष्ठ नागरिकांनी साई दर्शन घेतले व त्यानंतर गुरुवारी जपान येथील पाच महिला व एक पुरुष अश्या सहा भाविकांनी साई दरबारी हजेरी लावली त्यामुळे एवढ्या काही महिन्यांमध्ये विदेशातील भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून येत असून इतर साई भक्तांबरोबरच विदेशी साई भक्तांच्या सोबत काही अप्रिय घटना घडू नये म्हणून प्रशासनाने विशेष काळजी घेणे गरजेचे असून गुरुवारच्या दिवशी द्वारकामाई परिसरात गर्दी असल्याने त्या परिसरात साध्या वेशातील पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात यावा अशी मागणी आता पुढे येत असून साईबाबा संस्थान सुरक्षा विभागाने सुद्धा गेल्या अनेक महिन्यांपासून बंद झालेली साध्या वेशातील सुरक्षा रक्षकांची टीम मंदिर परिसरात पुन्हा कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी सुद्धा ग्रामस्थांमधून होत आहे.

kamlakar

सर्वात महत्त्वाचे म्हणजे साई दर्शनाला आल्यानंतर आपली पैशांची पर्स चोरीला गेली.. त्यातील मोठी रक्कम चोरीला गेली तरी सुद्धा या विदेशी भाविकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की आमची बाबांवर अतूट श्रध्दा असून बाबा नक्कीच आमचे पैसे परत मिळवून देतील आणि बाबांवर कोणत्याही प्रकारची आमची नाराजी नाही आमचा बाबांवर खूप जास्त विश्वास असल्याची प्रतिक्रिया बोलतांना व्यक्त केलीय.

याच दरम्यान त्यांनी शिर्डीतील प्रतिथयश व्यापारी राजेंद्र गंगवाल यांच्या दुकानात काही वस्तूंची खरेदी केली आणि विनोद गंगवाल यांनी त्या सर्व भाविकांचा साईबाबांची शाल देत सत्कार केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंदाचे आलेले भाव त्यांच्या मनातील प्रतिक्रिया सांगून जात होत्या दूर देशातून आल्यानंतर साईबाबांच्या नगरीत कोणीतरी त्यांचा साईबाबांची शाल अंगावर टाकून केलेल्या सत्कार त्यांच्यासाठी अतिशय अनमोल असल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते

ही घटना घडली त्यावेळी माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते हे देखील त्या परिसरात उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले व त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत साईबाबा संस्थान प्रशासन,मंदिर सुरक्षा विभाग व सुरक्षा रक्षकांवर संताप व्यक्त करत विदेशातील भाविकांच्या झालेल्या पैश्यांच्या चोरीची जबाबदारी कोण घेणार..? तसेच मंदिर परिसरात खुलेआम फिरणाऱ्या पाकीटमारांवर सुरक्षा विभागाचा वचक राहिला नसल्याचे सांगत साध्या वेशातील सुरक्षा रक्षकांची टीम पुन्हा कार्यरत करण्याची मागणी निलेश कोते यांनी केलीय

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button