Letest News
पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद
क्राईमशिर्डी

उल्हासनगरच्या विजयचे शिर्डी येथून अपहरण वडिलांनी शिर्डी पोलीस स्टेशनला केला गुन्हा दाखल

Vijay from Ulhasnagar was kidnapped from Shirdi. His father filed a case at Shirdi Police Station.

शिर्डी प्रतिनिधी उल्हासनगर तेथे राहणारे तुकाराम खंडु दरेकर यांनी शिर्डी येथून माझ्या मुलाचे अपहरण झाले असल्याची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला दखल केली आहे त्यात त्यांनी म्हटले आहे कि

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


माझा मुलगा नामे विजय तुकाराम दरेकर हा दिनांक 25/12/2025 रोजी हा शिर्डी येथे गेला होता आणि दिनांक 26.12.2022 रोजी मला माझा मुलगा विजय याचा फोन आला त्यावेळी फोन‌द्वारे त्याने मला सांगितले की, अनिल कोकाटे आणि त्यांचे मित्र संदीप वाळुंज हे मला शिर्डी येथे एका रेस्टॉरंटमध्ये भेटले. त्यावेळी माझे कडुन 1,00,000/- रु.ची रक्कम ही संदीप वाळुंज यांनी त्यांच्या नावे ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतली.

त्यानंतर माझ्या मुलाची हुंदाई कार क्र.एम एच/04/जी झेड 4959 या कार मध्ये रु. 13,34,000/- रोख रक्कम होती ती अनिल कोकाटे व त्याच्या मित्राने गाडीसह हिसकावून घेतली माझे मूळ ठिकाण नाशिकचे आहे आणि वरील सर्व व्यक्ती नाशिकचे आहेत. असे माझे मुलाने मला फोन‌द्वारे सांगीतले होते.

दिनांक 24/11/2023 रोजी दुपारी 02.00 वा.चे सुमारास अनाजी शिंदे, नागेश आहेर जानेश्वर शिंदे हे एक अनोळखी व्यक्ती माझ्या घरी आले होते आणि अनाजी शिंदे यांनी मला सांगितले की, माझा मुलगा विजय याने वरील सर्वांकडून सुमारे 20,00,000/- रुपये घेतले होते

आणि त्यांनी विजय कडून पैसे काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते पण ते देऊ शकले नाहीत. त्यावर श्री नागेश आहेर हसले आणि म्हणाले की आम्ही विजय कडून वसूल केलेले पैसे तुम्हाला कधीच मिळणार नाहीत. त्यावेळी ते काय बोलले त्याचा नेमका अर्थ काय ते मला समजले नाही.


दिनांक 18/12/2023 रोजी मी एका कार्यक्रमात चांदवड, जि. नाशिक येथे गेलो होतो
आणि मला एका अनोळखी व्यक्तीने भेटुन सांगितले की वरील इसम यांनी तुमचा मुलगा नामे विजय याचे अपहरण केले आहे. मी त्यावेळी घाबरलो. व काय प्रतिक्रिया द्यावी हे मला समजत नव्हते आणि त्या दिवषी मी माझे मुळ गावी चांदवड येथे मुक्कामी राहीलो व दुसया दिवशी बसने उल्हासनगर येथे परत आलो.

मला आणि माझ्या पत्नीला सुरुवातीला विश्वास बसला नव्हता की आमच्या मुलाचे अपहरण झाले आहे पण दिनांक 26/12/2022 पासून आजपावेतो माझे मुलाने आमच्याशी संपर्क साधला नाही किंवा त्याचा ठावठिकाणाही आम्हाला माहीत पडला नाही. तसेच माझा मुलगा विजय ज्यांच्याशी संपर्क ठेवू शकला नाही

आम्ही त्या सर्व व्यक्तींकडे आम्ही विचारपूस केली पण त्याच्याबद्दल कोणालाच काही माहिती मिळाली नाही. त्याचा शोध घेण्याचा मी माझ्या स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केला पण तो सापडला नाही मला खात्री आहे कि त्याचे अपहरण झालेले असल्याने मी शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 0650 दिनांक 14/06/2025 भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३६३,364-A,३७९,


३९२, ३९४,३९५ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहे अशी अश्याची फिर्याद दाखल झालेली आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button