Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
Blog

ग्रामपंचायत मध्ये दिव्यांगाकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करणार – सौ. सारिका कुंकलोळ

श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील दत्तनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दिव्यांग व्यक्ती करिता सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र दिव्यांग सुविधा कक्ष स्थापन करण्यात येईल.दिव्यांगाकरिता विशेष घरकुल योजना राबविण्यासाठी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांच्या संकल्पनेनुसार प्रकल्प नियोजन करण्यात येईल. महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा संकल्प केला आहे त्याची पुर्तता तातडीने करण्यात येईल असे प्रतिपादन दत्तनगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.सारिका कुंकलोळ यांनी केले.\

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने दत्तनगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी सौ.सारिका कुंकलोळ, सदस्यपदी श्री. प्रेमचंद कुंकलोळ, सौ.नयना शेवाळे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे,सचिव वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, उपाध्यक्ष सुनिल कानडे, जिल्हाध्यक्ष विश्वास काळे, दत्तनगर शाखेच्या अध्यक्षा सौ. विमल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

kamlakar


याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड यांनी दिव्यांग व्यक्ती करिता संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना,अंत्योदय योजना,स्वतंत्र रेशनकार्ड,५% राखीव निधी,वैद्यकीय सुविधा इ.योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र दिव्यांग सुविधा कक्ष स्थापन करावा अशी मागणी केली त्याचबरोबर दिव्यांग महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे या मागणीबरोबरच भावी कार्यकाळासाठी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी यांनी केले तर सुत्रसंचलन संजय साळवे यांनी केले शेवटी आभार सौ. अंजनाबाई रंधे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र दिवे,सौ.प्रमिला कानडे,सौ. संगिता वाघ,ढोणे मावशी,श्री. अंतोन धिवर,सुरेखा वाघ,यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button