Letest News
साईनगरीत रामनवमीचा जल्लोष- लाखोंच्या गर्दीतही शिस्तीचा विक्रम!भक्तीचा महासागर शिर्डीत उसळला-प्रशासना... शिर्डीत भाविकांना लक्ष्य- मंदिरातच दागिन्यांवर डल्ला – 1.25 लाखांचा ऐवज लंपास 🔥 शिर्डीत रेशन घोटाळा उघड-दुकानदाराची दादागिरी शिगेला- नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! 78 लाखांचा कापड घोटाळा उघड-अहिल्यानगर पोलिसांची राजस्थानपर्यंत धडक कारवाई AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा
अ.नगरराजकीय

विखे यांच्या विरोधात उभे असणारे उमेदवार डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली मुंबईत भेट! व केला सत्कार!

शिर्डी( प्रतिनिधी)
शिर्डी विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये ‌ अपक्ष म्हणून उमेदवारी केलेले पराभूत भाजपाचे बंडखोर उमेदवार डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी नुकतीच मुंबई येथे भाजपाचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे सर्वच आश्चर्यचकित झाले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील सागर या निवासस्थानी जाऊन तेथे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व राज्यात भाजपला चांगल्या जागा मिळाल्या. त्याबद्दल त्यांचा सत्कार केला. एवढेच नाही तर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत निखिल पिपाडा, कन्या टिंकल पिपाडा आदी उपस्थित होते.


डॉक्टर राजेंद्र पिपाडा हे विखे पा. यांचे कट्टर राजकीय विरोधक समजले जातात. त्यामुळेच त्यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपात बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी भाजपाचे वरिष्ठ नेत्यांनी त्यांना विशेष विमान शिर्डीला पाठवून मुंबईला निवडणुकी अगोदर बोलावले होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा झाली.

मात्र तरीही डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी न काढता ते निवडणूक लढले , भाजपात बंडखोरी केलेल्या जिल्ह्यातील दोन नेत्यांना भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निलंबित केले मात्र डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांना पक्षातून अद्यापही निलंबित केलेले नाही. या निवडणुकीत ते पराभूतही झाले.

मात्र तरीही त्यांनी मुंबई येथे जाऊन भाजपाचे नेते व भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सागर बंगल्यावर जाऊन चर्चा केली. भेट घेतली. सत्कार केला.


महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून सध्या मोठ्या चर्चेत असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी नंतर शिर्डी मतदार संघात डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांच्या फडणवीस भेटी संदर्भात सध्या मोठी चर्चा होत आहे. जरी डॉक्टर राजेंद्र पिपाडा भाजपाचे बंडखोर म्हणून लढले तरी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याचे यावरून दिसून येते. व तसे तालुक्यात बोलले जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button