Letest News
शिर्डीच्या दोन दमदार व्यक्तिमत्त्वांचा गौरव-विठ्ठलराव पवार आणि दिलीप खरात सन्मानित शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात स्मोक हँड ग्रेनेडचा स्फोट-चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी समता पतसंस्थेच्या “मॅनेजरच्या सांगण्यावरूनच पैसे टाकले” भोंदू खरातची न्यायालयात धक्कादायक कबुली वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस साईचरणी नतमस्तक-भक्ती ते शक्ती : शिर्डीत डिफेन्स प्रकल्पाचे भव्य ... “शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी... “क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?” “गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!”
क्राईमशिर्डी

होय मी १४ लाख दिले साई राम बाबाचा कबुलीनामा दैनिक साईदर्शनला कारवाईची नोटीस देणाऱ्या त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार

शिर्डी (प्रतिनिधी) तथाकथित  साईराम बाबा या महाराजांने संस्थांनच्या एका कामगाराने १४  लाख रुपये घेऊन  आपली फसवणूक केल्याचा खळबळजनक  आरोप केला होता त्यास दैनिक साईदर्शनने बातमी प्रसिध्द केली होती जनहिताच्या प्रश्नांना व्यासपीठ देणे हे प्रसिद्धी माध्यमांचे काम असते चौकशी व्हावी हि सामान्य नागरिकाची अपेक्षा होती मात्र  वृत्तपत्राकडेच संस्थांनकडून खुलासा मागण्यात आला होता.  

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिर्डीतील धाडसी  युवकांनी हा प्रश्न हातात घेतला होता त्यानी भेट घेऊन खुलासा विचारला असता साईराम बाबानी केलेला अतुल वरील आरोप खरा असल्याची कबुली दिली  अतुलचा पाठीराखा कोण यांची चौकशी होत नाही ती जनतेला अपेक्षित आहे वृत्तपत्रांचे बातमीचे सोर्स विचारण्याचा कोणाला कायद्याने अधिकार नाही! असे असताना खुलासा मागण्याचे कारण काय? यासंदर्भात मोठे प्रश्न उपस्थित होत असून जर  साईराम बाबानेच आता 14 लाख रुपये एका संस्थान कर्मचाऱ्याला दिल्याचे जाहीर मान्य केले आहे.

तर मग संस्थांनने कायदेशीर चौकशी करणे गरजेचे होते .मात्र हे प्रकरण चव्हाट्यावर आणणाऱ्या दैनिक साईदर्शनला   बदनामी केली.अशीह नोटीस पाठवणाऱ्यांवर अब्रू नुकसान भरपाईसाठी न्यायालयात धाव घेणार आहे
 उलट पदोन्नती देण्यात आली होती  . साईराम बाबाचे   व्हीआयपी पद्धतीने दर्शना बाबत शिर्डीतील तरुण युवकांनी  कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे .

या निवेदनात म्हटले की, साई संस्थान व्हीआयपी गेट क्र. २ मधून श्री साईराम बाबा नामक महाराज आणि इतर साई भक्तांना व्हीआयपी प्रोटोकॉल दिल्याबाबत  प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून सदर श्री साईराम बाबा यांच्यावर संस्थांनचे अध्यक्ष आणि पोलिस अधीक्षक यांचे मार्फत चौकशी सुरू असताना कोणाच्या सांगण्यावरून त्यास व्हीआयपी पद्धतीने दर्शन देण्यात येते ..? त्यास वरदहस्त कोणाचा ..? त्याचबरोबर संरक्षण कार्यालयात त्याचा वावर बिनदिक्कत पणे कसा होतो ..?

असा सवाल शिर्डीतील ग्रामस्थ युवकांनी संस्थान प्रशासनाला या निवेदनातून नुकताच केला असून याची सखोल चौकशी होऊन सदर प्रकरणी दोषीची  वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत कठोर कारवाई करावी याकडे लक्ष  वेधले आहे
 हाहबाबा गुन्हा दाखल करत नाही व आरोप करतो यामुळे साईबाबा संस्थानची प्रतिमा मलिन होते  कोणताही पास न घेता डोक्यावर पादुका घेऊन व्हीआयपी दर्शन, त्याचबरोबर त्या दर्शनाची व्हिडिओ शुटींग कशी होते  चक्क समाधी मंदिरात ६ फेब्रुवारी २०२४ रोजी सदर व्यक्तीचे फोटो सेशन झाल्याचा धक्कादायक आरोप   युवकांनी केला आहे

दोषींवर कारवाई झाली पाहिजे यासाठी तरुणाचा जसा आग्रह आहे तसा जनहिताच्या साठी दैनिक साई दर्शनची देखील तीच भूमिका आहे नेहमीच साईभक्त व ग्रामस्थ यांच्या साठी नेहमीच साई दर्शनने लढा दिला हे जनतेला देखील माहीत आहे ज्ञात अज्ञात वाचकाच्या पाठबळावर   आमचा लढा सुरू राहील साईराम बाबा व १४ लाख या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात देखील लढा दिला जाईल हिच साई दर्शनची भुमिका राहील यात शंका नाही

या वृत्तपत्राकडे खुलासा मागितला होता. नोटीस दिली होती.हे सुद्धा संस्थांनने जाहीर करावे. ज्या वृत्तपत्राने शिर्डीतील पाकिटमारी आणि पाकिटमारी करणाऱ्या टोळीला संपूर्णपणे आळा बसविला नेहमीच साईभक्तांच्या हिताचे काम ज्या दैनिकाने केले हे इतिहास संस्थांच्या अधिकाऱ्यांनी तपासायला पाहिजे होते तशे न करता चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम संस्थानाने केले आहे त्यांच्यावर दैनिक साईदर्शन  लवकरचअब्रू नुकसानीचा दावाही दाखल  करणार आहे .

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button