Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
शिर्डी

साई आश्रम समोर अनधिकृतपणे लागणारी वडापावची गाडी कोणाची…? बचत गटाच्या नावाखाली अतिक्रमणाला नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाचा आशीर्वाद आहे का ?

शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा नगरपरिषदेचा सातत्याने प्रयत्न असतो . येथे अतिक्रमण होऊ दिले जात नाही.
मात्र साई संस्थांनच्या साई आश्रम (एक हजार रूम) समोर महिला बचत गटाच्या नावाने अतिक्रमण करून एक हातगाडी चालवली जाते. या हातगाडीला नगर परिषदेची परवानगी नसताना ती कोणाच्या आशीर्वादवर चालते? असा सवाल आता केला जात आहे. जर कोणी अतिक्रमण करून हातगाडी चालवणार असेल तर इतरांनाही तशी परवानगी द्या अन्यथा बिगर परवानगीची ही येथे व्यवसायासाठी लावण्यात येत असलेली हातगाडी हटवावी. अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे कार्याध्यक्ष समीर रामचंद्र वीर यांनी केली आहे.
समीर वीर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शिर्डी मध्ये साई आश्रम एक (हजार रूम )समोर नगरपरिषदेच्या जागेत एक अतिक्रमित हातगाडी लावली जाते.व व्यवसाय केला जातो. महिला बचत गटाच्या नावाने ही हातगाडी चालवली जाते. शिर्डी नगर परिषदेला माहिती अधिकारात माहिती मागवली असता शिर्डी शहरांमध्ये महिला बचत गटांना दुकान स्टॉल टाकण्यासाठी किंवा हातगाडी चालवण्यासाठी परवानगी दिलेली आहे की नाही ?
दिलेली असल्यास त्याची सविस्तर माहिती मिळावी. म्हणून माहिती मागवली असता शिर्डी नगर परिषदेने शिर्डी शहरात कोणालाही अशी परवानगी दिलेली नाही. शिर्डी नगर परिषदेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी मिरीकर यांनाही आमच्या प्रतिनिधीने फोनवर विचारले असता त्यांनीही अशी कोणती परवानगी कोणत्याही महिला बचत गटाला किंवा कोणालाही दिलेली नाही. अशी माहिती दिली आहे
. जर शिर्डी नगर परिषदेने कोणालाही किंवा महिला बचत गटाला दुकान स्टॉल किंवा हातगाडी चालवण्यास परवानगी दिलेली नसताना मग एक हजार रूम समोर महिला बचत गटाच्या अंतर्गत ही हातगाडी कशी लावली जाते व व्यवसाय कसा केला जातो. तो कोणाच्या आशीर्वादाने केला जातो….? यात काही नगर परिषदचे कर्मचारी अधिकारी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तर अर्थिक देवाणघेवानातून तर मदत करत नाहीना याचीही नगरपरिषदेने चौकशी करावी. एकतर ही हातगाडी हटवावी . किंवा इतरांनाही शहरात व्यवसाय करण्यासाठी दुकान स्टॉल, हातगाडी नगरपरिषदेच्या जागेत लावण्यास परवानगी द्यावी .अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे कार्याध्यक्ष समीर रामचंद्र वीर यांनी पत्रकात केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button