Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
अ.नगरराजकीय

विखे विरुद्ध पिपाडा” – शहरातील चर्चेचा विषय कमळ फुलले…!” — ममता पिपाडांचा ऐतिहासिक विजय“हा विजय जनतेच्या विश्वासाचा”ममता पिपाडा

भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या पत्नी ममता राजेंद्र पिपाडा यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवत राहाता शहरात भाजपचा झेंडा पुन्हा फडकावला.
त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या अंजली कैलास सदाफळ यांना ८८८ मतांनी पराभव पत्करावा लागला, तर अपक्ष उमेदवार दीक्षाली प्रसाद निधाने यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
ही निवडणूक केवळ तीन उमेदवारांची नव्हती — ती होती विखे व पिपाडा या दोन प्रभावी घराण्यांमधील प्रतिष्ठेची थरारक लढत.
.

sai nirman
जाहिरात

🌸 “कमळ फुलले…!” — ममता पिपाडांचा ऐतिहासिक विजय
डिसेंबर २०१६ मधील राहाता नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरात अक्षरशः राजकीय भूकंप झाला होता. त्या वेळी काँग्रेसमध्ये असलेल्या ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांच्या पत्नी अंजली सदाफळ यांना पंजा चिन्हावर उमेदवारी दिली होती.

तर भाजपचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी आपल्या पत्नी ममता पिपाडा यांना कमळ चिन्हावर मैदानात उतरवले. शहरात “विखे विरुद्ध पिपाडा” अशी थेट लढत रंगली आणि दोन्ही गटांनी प्रतिष्ठेचा प्रश्न मानून झोकून दिला.विखेंच्या दडपशाही व हुकुमशाही तसेच जनतेला गुलाम बनवण्याच्या विरोधात डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी आवाज उठवला व पिपाडा-विखे लढतीत विखेंचा पराभव झाला.

🔥 बंडखोरीचा सूर – “रोड रोलर”ने रंगात आणला तिढा
भाजपने तिकीट न दिल्यामुळे माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने यांनी नाराज होत आपल्या सूनबाई दीक्षाली प्रसाद निधाने यांना अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले.
‘रोड रोलर’ या चिन्हावर त्यांनी प्रचाराचा गतीमान सूर लावला.
त्यांच्या जुन्या कार्यकाळातील जनसंपर्कामुळे मतदारांमध्ये त्यांना सहानुभूतीची लाट मिळाली, मात्र दोन्ही प्रमुख पक्षांच्या ताकदीसमोर ही लाट मोठी ठरू शकली नाही.

DN SPORTS

🎤 प्रचाराचा जल्लोष – सभा, रॅली आणि प्रतिष्ठेची स्पर्धा
निवडणुकीचा काळ जवळ येताच राहात्याचं वातावरण राजकीय रणांगणात बदललं.
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निवडणुकीला प्रतिष्ठेचा प्रश्न मानत शहरातील प्रत्येक प्रभागात सभा घेतल्या. त्यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी देखील प्रचारात उतरून मीच उमेदवार आहे असे घरोघरी जावुन मतदारांशी थेट संवाद साधला. राहुरी कारखाना जिंकल्याने राहाता न.पा.सहज जिंकु असे त्यांना वाटले होते. परंतु जनतेने विखेंचा पराभव केल्याने राज्य पातळीवर त्यांना धक्का बसला.
दुसरीकडे डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी भाजपची संपूर्ण यंत्रणा सज्ज करून कार्यकर्त्यांना एकच नारा दिला —
दहशत मुक्त शहर व जनतेला गुलाम बनवणे व गणेश परिसरावर नेहमी वक्र दृष्टी ठेवणा-या विखे परिवाराच्या ताब्यात न.पा. देवु नका असे आवाहन केले होते.
घराघरात प्रचार, सोशल मीडियावर मोहिम, रॅली, ढोलताशे आणि घोषणांनी शहर गजबजून गेले.
💥 “विखे विरुद्ध पिपाडा” – शहरातील चर्चेचा विषय
संपूर्ण शहरात एकच चर्चा —
“विखेंचा पंजा की पिपाड्यांचं कमळ?”
चहाच्या टपऱ्यांवर, बाजारपेठेत, अगदी घराघरातही मतदारांचे अंदाज सुरू होते.

काँग्रेसचे जुने कार्यकर्ते अंजली सदाफळ यांच्या पाठीशी ठाम होते, तर तरुण वर्ग आणि महिला मतदारांमध्ये ममता पिपाडांचा प्रभाव वाढत होता. अपक्ष दीक्षाली निधाने यांना ओबीसींची मते खाण्यासाठी उभे कऱण्यात आले होते हे जनतेच्या लक्षात आले त्यामुळे त्यांचे डिपॉजिट जप्त झाले होते ,पण निर्णायक लढत मात्र दोनच घराण्यांत होती.

🗳️ मतमोजणीचा थरार – “कमळ फुललं!”
मतमोजणीच्या दिवशी शहरभर तणावाचं वातावरण होतं. सकाळी पहिल्या फेरीत अंजली सदाफळ थोड्या आघाडीवर होत्या, मात्र दुसऱ्या फेरीनंतर चित्र पालटलं. ममता पिपाडा या दुस-या फेरीपासुन मतांची आघाडी घेवुन पुढे सरकल्या आणि नंतरच्या फेऱ्यांमध्ये त्यांनी आघाडी कायम ठेवली.
मतमोजणीच्या शेवटी निकाल स्पष्ट झाला —
ममता राजेंद्र पिपाडा यांचा ऐतिहासिक विजय होवुन दुस-यांना त्या लोकनियुक्त नगराध्यक्षा झाल्या.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

शहरभर “कमळ फुललं…!” या घोषणांनी दुमदुमून गेलं.

🌟 ममता पिपाडा म्हणाल्या – “हा विजय जनतेच्या विश्वासाचा”
2016 मधील विजयानंतर ममता पिपाडा त्यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या —

“हा माझा किंवा कुटुंबाचा विजय नाही, हा राहात्यातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा विजय आहे.
महिलांचा सन्मान, विकासाच्या योजना आणि पारदर्शक प्रशासन देणं — ही माझी जबाबदारी आहे.”

kamlakar

त्यांच्या या वक्तव्याने कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झालं.

🗣️ विखे गटाची प्रतिक्रिया – “राजकारणात पराभव नाही, अनुभव असतो”

निकालानंतर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले —

“आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले. पराभव म्हणजे शेवट नाही, तो पुढील लढतीसाठीचा अनुभव आहे.
जनतेचा कौल सर्वोच्च असतो, त्याचा आम्ही सन्मान करतो.”
त्याचवेळी अंजली सदाफळ यांनी देखील मतदारांचे आभार मानत सांगितले,
“जनतेच्या अपेक्षा पूर्ण न झाल्या असतील, पण विश्वास संपलेला नाही.

राहात्याच्या विकासासाठी आम्ही सदैव तयार आहोत.”

🔮 पुढचं राजकीय समीकरण – “पिपाडा विरुद्ध विखे” पुन्हा?
या निकालानंतर पिपाडांना दुस-यांदा लोकनियुक्त नगराध्यक्ष पद मिळाले राहात्याच्या राजकारणात एक नवा समीकरण स्पष्ट झालं — 1991 पासुन डॉ.राजेंद्र पिपाडा विखेंच्या विरोधात पॅनल उभे करतात.
पुढील काळात पिपाडा व विखे हे दोन गटच शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत.

तर विखे गट आता नव्या रणनीतीने पुनरागमनाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

🕊️ निष्कर्ष -राहात्याच्या राजकारणात नवा अध्याय
ही निवडणूक केवळ विजय-पराभवापुरती मर्यादित नव्हती,
ती होती राहात्याच्या राजकीय इतिहासातील एक नवा अध्याय.
विखे-पिपाडा या दोन घराण्यांतील स्पर्धा, अपक्ष उमेदवाराला उभे करुन पिपाडांना पराभव करायचा प्रयत्न, आणि जनतेचा सहभाग —
या सगळ्यांनी राहात्याच्या लोकशाहीला नवी झळाळी दिली.
आणि शेवटी,
“कमळ फुललं” — हा फक्त निकाल नव्हता, ती होती राहात्याच्या जनतेच्या मनातील विखेंच्या विरोधातील भावना!

निवडणुक 2025 राहाता न.पा. –
राहाता शहरात गेल्या 30 वर्षापासुन पिपाडा दाम्पत्य पॅनल उभे करत असल्याने डॉ.राजेंद्र पिपाडा व ममता पिपाडा यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने त्यांच्या भुमिकेवरच पुढील नगराध्यक्ष कोण ते ठरेल अशी चर्चा आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button