Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
क्राईमशिर्डी

बनावट जात प्रमाणपत्र बनवणारी टोळी सक्रिय,शिर्डीत प्रकरण उघड  

मागास प्रवर्गातील व्यक्तीला शिक्षण,राजकारण,नोकरी किंवा इतर कशातही आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते.मात्र या कामासाठी बनावट प्रमाणत्र देणारी एक टोळी कोपरगाव शहरात सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती शिर्डीत उघड झाली असल्याची माहिती हाती आली असून त्यांच्यावर शिर्डी येथील प्रांताधिकारी यांनी कारवाई सुरू केली आहे.त्याला जबाबदार अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

sai nirman
जाहिरात

मागास प्रवर्गातील व्यक्तीला शिक्षण,राजकारण,नोकरी किंवा इतर कशातही आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते.आरक्षित जागांवर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतला किंवा नोकरी मिळवली तर जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असतं.यासोबतच सरकारी नोकरदारांना आरक्षणानुसार बढती मिळवायची असेल तर त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असणं आवश्यक असतं.वर्तमानात याच ओबीसी आरक्षणावरून मोठे रणकंदन सुरू आहे.यावरून याचे गांभीर्य सहज लक्षात येईल.
मात्र हे जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय ? हे प्रमाणपत्र काढण्यासाठी कुठे अर्ज करावा लागतो? त्यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतात ? आणि जात वैधता प्रमाणपत्र नेमकं किती दिवसात मिळतं ? याची अनेक ग्रामस्थांना माहिती नसते याचा अनेक टोळ्या फायदा उचलून त्यांची मोठी आर्थिक लुबाडणूक करताना दिसत असून याचीच पूनरार्वृती कोपरगाव शहरात होतांना दिसत असून अशीच एक टोळी उघड झाली असल्याची माहिती हाती आली आहे.

या बाबत एका इतर मागास जात प्रमापत्राची शंका अधिकाऱ्यांना आल्याने हा भांडाफोड झाला 

आहे.या बाबत आता तपासणी सुरू झाली असून प्राथमिक तपासणीत कोपरगाव तहसील पातळीवर दोन तर एक प्रांत शिर्डी पातळीवर एक प्रमाणपत्र बनावट आढळून आले आहे.

DN SPORTS

दरम्यान या पूर्वी तहसीलमधील अनेक कागदपत्रे बाहेर दलाल यांचेकडे आढळून आले असताना व त्याची संबंधितांना माहिती असताना या पूर्वीच्या तहसीलदारांनी काहीही कारवाई केलेली असल्याचे दिसून आले नाही.त्यामुळे जबाबदार अधिकारी यात सामील असल्याचे उघड झाले आहे. महुसल मंत्र्यांच्या जिल्ह्यात हे दलाल सक्रिय असल्याने आता प्रांताधिकारी काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button