Letest News
पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद
अ.नगरशिर्डी

उत्तर भारतातील श्री साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळ्याला अभूतपूर्व उत्साह-भजन-कीर्तन ढोल ताशे पुष्पवृष्टीत पादुकांचे भव्य स्वागत

विदर्भातील ऐतिहासिक यशानंतर श्री साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळ्याचा उत्तर भारतातील दौरा सध्या जोमात सुरू असून हजारो साईभक्तांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीने प्रत्येक शहरात भक्तिभावाचे अनोखे वातावरण निर्माण झाले आहे.
दिनांक ०१ डिसेंबर ते १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत दिल्ली, चंदीगड, जालंधर, लखनौ आदी प्रमुख शहरांत पादुका दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

🔹दिल्ली, नोएडा, रोहिणी येथे साईभक्तांचा मोठा सहभाग

दौऱ्याची सुरुवात ०१ डिसेंबर रोजी दिल्ली येथून झाली. त्यानंतर नोएडा आणि रोहिणी येथे झालेल्या पादुका दर्शन सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित राहिले.
श्रींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. ‘ॐ साईराम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तीरसाने न्हाऊन निघाला होता.
वृद्ध, महिलांपासून ते युवकांपर्यंत सर्वांनी भक्तिभावाने पादुका दर्शनाचा लाभ घेतला.

DN SPORTS

🔹चंदीगडमध्ये भजन-कीर्तन, ढोल ताशे, पुष्पवृष्टीत पादुकांचे भव्य स्वागत

०५ डिसेंबर रोजी चंदीगडमध्ये पादुका पोहोचताच शहरात भव्य स्वागत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.
भजनमंडळे, ढोल-ताशा पथके, टाळ-मृदुंग, फुलांची पुष्पवृष्टी, महिलांच्या आरत्या आणि सामाजिक संस्थांचे स्वागत उपक्रम यामुळे संपूर्ण परिसरात साईभक्तीची अभूतपूर्व ऊर्जा निर्माण झाली.
स्थानिक संस्था, महिला मंडळे, युवक-वृद्ध संघटना तसेच आदिवासी व दिव्यांग बांधवांनी आणि अनाथालयातील मुलांनीही पादुकांचे दर्शन घेऊन भावनिक क्षण अनुभवले.


🔹आगामी शहरांतही मोठा कार्यक्रम; संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडिलकर यांचे आवाहन

दौऱ्याचा पुढील विस्तार खालील शहरांत होणार आहे:

जालंधर – ०७ डिसेंबर

kamlakar

कुरुक्षेत्र – ०८ डिसेंबर

आगरा – ०९ व १० डिसेंबर

लखनऊ – ११ व १२ डिसेंबर

बाराबंकी – १३ डिसेंबर

या प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवर भव्य धार्मिक मिरवणुका, सेवा उपक्रम, भजन-कीर्तन, आरत्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी भाविकांना आवाहन करताना म्हटले की,
“पादुका दर्शन हा अत्यंत पवित्र आणि दुर्लभ अनुभव आहे. ज्या ठिकाणी दर्शन आयोजित करण्यात आले आहे, तेथे सर्व साईभक्तांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा.”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button