Letest News
खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका राज्यातील शासकीय रुग्णालयांत मोफत उपचारांना ब्रेक! आता उपचारांसाठी रुग्णांना मोजावे लागणार पैसे शिर्डीत मध्यरात्री थरार! ‘झिंग्या गँग’चा तरुणावर जीवघेणा हल्ला शिर्डीच्या मातीचा जागतिक झेंडा! ‘Future IP Leader Award’ने गौरव लोकचंदानी यांचा सन्मान 24 तासांत न्याय! कर्तव्यदक्ष कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांची कणखर व निर्भय कारवाई दबावाला न ज... अहिल्यानगरमध्ये कारवाई… शिर्डीत कधी? ब्लॅक फिल्मविरोधात ४५८ वाहनांवर दंड-नागरिकांचा सवाल तीन पत्ती तिरट जुगार खेळणारे ६ जण ताब्यात-रोख रक्कम-मोबाईल व दुचाकी जप्त
अ.नगरराजकीय

विखेंना धक्का देण्यासाठी शरद पवार नगर जिल्ह्यात सक्रिय होणार आठ जागेवर दावा करणार

विधानसभेच्या आठ जागांवर लढायला हवं असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे त्या आठ मतदारसंघांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरु केली आहे,’ अशी माहिती फाळकेंनी दिली. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांचा विचार करता शरद पवार गट नगरमध्ये सर्वात भक्कम असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणमध्ये शरद पवार गटाच्या निलेश लंकेंनी भाजपच्या सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. महायुती सरकारमध्ये मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या लेकाला पाणी पाजल्यानं नगरमधील शरद पवार गटाच्या आशा उंचावल्या आहेत.नगर जिल्ह्यात विखे पाटील कुटुंबाचं वर्चस्व आहे. संस्था, कारखान्यांचं जाळं ही विखे पाटलांची ताकद आहे. पण लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून लढत लंकेंनी विखे पाटलांना धक्का दिला. त्यानंतर आता विधानसभेसाठी शरद पवारांनी आठ जागांवर तयारी सुरु केली आहे. अकोले, नगर शहर, पारनेर, राहुरी, कोपरगाव आणि कर्जत-जामखेड या सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिंकल्या होत्या.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button