Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
क्राईमशिर्डी

लोकशाहीचा स्तंभ असणाऱ्या वृत्तपत्र व पत्रकारांवर दबाव आणण्याचा कोणी प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार वायदंडे

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी येथे एका ट्रेडिंग कंपनी वतीने गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून मोठा शेअर्स मार्केट घोटाळा केल्याची चर्चा शिर्डीत सध्या सुरू असून त्या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर वृत्तपत्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न काहींनी पैशाच्या जीवावर करण्याचा काही अंशी प्रयत्न केला मात्र असा प्रयत्न करणारे यशस्वी होणार नाहीत व आम्ही त्यांना होऊ देणार नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष त्या विरोधात आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही व दैनिक साई दर्शन ने जे वृत्त प्रसिद्ध केले ते गुंतवणूकदारांची चर्चा म्हणून प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे कोणीही असो वृत्तपत्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर साई दर्शन च्या व लोकशाहीच्या चौथा स्तंभ असणाऱ्या या वृत्तपत्रांच्या पाठीमागे संपूर्ण रिपब्लिकन पक्ष पाठीशी खंबीरपणे उभा राहील व जशास तसे उत्तर दिले जाईल.

असा इशारा पक्षाचे रमेश वायदंडे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. रमेश वायदंडे यांनी म्हटले आहे की. वृत्तपत्रे व पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजात जे काही चालले आहे ते सत्य उजाडत आणण्याचे काम वृत्तपत्र करत असतात. मात्र काही जण आपले कारनामे वृत्तपत्रातून उघड होऊ नये म्हणून वेगवेगळ्या मार्गाने वृत्तपत्र स्वातंत्र्यावर दबाब आणण्याचा प्रयत्न करतात.

तसाच प्रकार शिर्डीत दैनिक साई दर्शन च्या बाबतीत नुकताच घडला असून साई दर्शन पोर्टलने शिर्डीतील एका ट्रेडिंग कंपनीच्या शेअर्स घोटाळ्याची गुंतवणूकदारांमध्ये सुरू असलेली दबक्या आवाजातील चर्चा आपल्या वृत्ताद्वारे प्रसिद्ध केली होती. त्यानंतर काहींनी पैशाच्या जीवावर बातमी का दिली म्हणून जितेश लोकचंदानी यांना एक प्रकारे धमकी देण्यात आली.

मात्र असा हा प्रकार निंदनीय असून वृत्तपत्र स्वातंत्र्यावर कोणी दबाव आणू नये .कोणी कितीही मोठा असला तरी वृत्तपत्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष पूर्ण ताकदीनिशी वृत्तपत्र व लोकशाहीच्या स्तंभा साठी खंबीरपणे पाठीमागे उभा राहील असा इशाराही रिपब्लिकन मातंग आघाडीचे जिल्हाअध्यक्ष रमेश वायदंडे यांनी दिला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button