Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
क्राईमशिर्डी

मुरघासाचे कामाला आले अन् खुन करून पळून गेले! मोबाईलने केला घात अन पोलिसांनी त्या आरोपींना पकडून आणले!! 

शिर्डी : जनावरांना मक्याचा मुरघास बनविण्याच्या कामा साठी आलेल्या दोन तरुणांनी ज्या ठिकाणी काम केले त्याच ठिकाणच्या घरातील दोघांना ठार मारून पळाल्याची घटना दोन दिवसापूर्वी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली मात्र चोरलेल्या मोबाईल मुळे त्यांना बेड्या ठोकण्यात पोलीसांना यश आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या घटनेत साहेबराव पोपट भोसले, कृष्णा साहेबराव भोसले यांना जिवे मारण्यात आले तर साखरबाई साहेबराव भोसले यांना गंभीर मारहाण करण्यात आली होती.
संदिप दहाबाड वय १८ व जगन काशिनाथ किरकिरे वय २५ या दोन तरुणांना काकडी शिवारात मका ची कुट्टी करून जनावरांचा चारा मुरघास बनविण्याचे कामासाठी भोसले यांचे नातेवाईकांनी या दोघा तरुणांना काकडी शिवारात आणले होते .

बरेच दिवस ते दोघे या ठिकाणी काम करता करता अनेक शेतकऱ्यांचे येथे कामानिमित त्यांचे जाणे येणे सुरू होते. साहेबराव भोसले यांचा दुग्ध व्यवसाय असल्याने त्यांचा मुरघास या तरुणांनी बनवून दिला. त्यामुळे ओळख वाढल्याने भोसले यांचे घरी त्यांचे जाने येणे सुरू होते . ज्यावेळी साहेबराव किवा कृष्णा घरात नसेल त्यावेळी ते दोघे पाणी पिण्याचे निमित्ताने घराची सर्व झाडी घेत असत. घरात काय कुठे आहे,

चोरी केल्यास किती माल मिळेल याची सर्व माहिती त्यांनी घेतली परंतु हि गेम कधी वाजवायची हा गोंधळ त्यांचे मनात सुरु होता. जाताना मोठा माल घेवून जावू असे ते दोघ स्वप्न रंगवत असताना काकडी शिवारातले मुरघासाचे काम संपले म्हणून घरी परतायचे असल्याने अखेर त्यांनी ५ एप्रील ची रात्र निवडली. रात्री पासुनच भोसले यांच्या घराचे आसपास दबा धरून बसलेले दोघांनी पहाटेच्या वेळी भोसले यांचा दरवाजा ठोठावला.

ओळखीच्या कामगारांचा आवाज आहे म्हणून दरवाजा उघडला असता दोघांनी आपल्या जवळील टणक हत्यार व पावड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली गंभीर दुखापत झाल्यानं कृष्णा व साहेबराव निपचित रक्ताच्या थारोळ्यात पडले. पत्नी साखरबाई यांनीही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही जबर जखमी हे दोघे दरोडेखोर मोटार सायकल, मोबाईल व सोने घेवून पसार झाले. साहेबराव यांची वृद्ध आई कर्णबधीर व अंध असल्याने त्यांना घरात काय घडले याचा मागमूस ही लागला नाही.

सकाळ झाली भोसले हे नित्यनेमाने सकाळी दूध घेऊन येतात आज का आले नाही म्हणून डेअरी वाल्याने निरोप धाडला असता . निरोप घेवून गेलेल्या माणसाने हे तिघेही रक्ताचे थारोळयात त्याला दिसले घटना वाऱ्यासारखी पसरली राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, शिर्डीचे डीवायएसपी वमने घटनास्थळी दाखल झाले.

चोरी झालेला मोबाईल लोकेशन वर टाकला परंतू मोबाईल बंद असल्याने लोकेशन दाखवत नव्हता अखेर दुपार नंतर आरोपींनी आता धोका नाही अशी खात्री झाल्याने सिन्नर येथील पळसे टोल नाक्या नजिक मोबाईल ऑन केला. पोलीसांना मोबाईल लोकेशन मिळताच सिन्नर पोलीसांच्या मदतीने अवघ्या काही तासात दोघाना जेरबंद करण्यात यश आले आहे.


जखमी साखरबाई प्रवरा हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असुन कृष्णा व साहेबराव यांचा अंत्यविधी करण्यात आला.
दरम्यान या परिसरात अनेक बाहेरच्या टोळ्या शेत कामासाठी येत असून त्यांची पार्श्वभूमी न तपासता त्यांचेवर विश्वास ठेवत आहे त्यामुळे असे प्रकार घडत असून पोलीस ठाण्यात सदर कामगारांची शाहनिशा करून नंतरच त्यांना आपल्या गावात काम देणे गरजेचे आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button