Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरराजकीय

कोणताही शोक, दुःख व्यक्त न करता डिजेच्या संगीत व बुद्धमय शांत वातावरणात बुद्धवाशी लक्ष्मणराव दुशिंग यांची राष्ट्रगीताच्या धूनमध्ये करण्यात आली अंतिम बिदाई!

शिर्डी (प्रतिनिधी) सहसा डिजे किंवा बॅन्ड हे वाद्य दुखःद प्रसंगी वाजवले जात नाही परंतू या परंपरेला फाटा देत ज्या बापाने आयुष्य भर अपार कष्ट करून आपले आदर्श पिढी घडवली त्याबरोबरच समाजाला दिशा दिली. अशा बापाचे पांग फेडण्यासाठी बेट्याने गावातून वाजत गाजत काढलेली अंत्ययात्रा पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दि .१८ एप्रिल ला सायंकाळी पाच वाजता निघालेली अंत्ययात्रा ती ही डीजे च्या तालावर, तथागत भगवान गौतम बुद्ध, व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावरील मंजूळ गितांचा स्वर ,त्यामागे सजवलेल्या सुगती रथात अशोकचक्राच्या निळ्या ध्वजात लपेटलेला मृतदेह तेथेही बुद्धं शरणं गच्छामी नामस्वर तर त्यापुढे ताटात मेनबत्ती, अगरबत्ती, पाण्याने भरलेला कलश हातात घेऊन जड अंतःकरणाने संथगतीने चाललेला

मुलगा व सोबतीला पुज्य भंते संघ यांचेसह डीजे च्या वाद्यांसह असा दिड किलोमिटर पायी चालत असलेला जनसमुदायाने अमरधामात प्रवेश केला . पूज्य भंते यांनी विधीवत पूजा करत अग्नीडाग दिलेनंतर स्तब्ध उभे राहत वाहिलेली श्रद्धांजली व त्याच वेळी डीजे ने वाजवलेली जनगणमन या राष्ट्रगिताच्या धुन ने सांगता झालेला अंत्यविधी असा हा आगळा वेगळा अंत्यविधी पार पडला


राहाता तालुक्यातील शिर्डी येथील पत्रकार अशोक दुशिंग यांचे वडील लक्ष्मणराव दुशिंग यांचे नुकतेच वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले . त्यांनी माझे निधन झाल्यानंतर कोणतेही कर्मकांड न करता दुःख व्यक्त करू नये हि त्यांची इच्छा व्यक्त केली होती. हि वडीलांची इच्छा पुर्ण करण्यासाठी अशोक दुशिंग यांनी हा अंत्यविधी आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिंगवे अमरधाम मधे पार पाडला .

यावेळी विधीस समाजातील विविध घटकांतील मान्यवरांसह व राष्ट्र सहयाद्री माध्यम समूहाचे संपादक करण नवले, शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, डॉक्टर राजेंद्र पिपाडा , दैनिक साईदर्शनचे संपादक जितेश लोकचंदांनी, मुस्ताक भाई रहता, सावळीविहीरचे पोलीस पाटील सुरेश वाघमारे, बौद्धाचार्य गौतम गोडगे,

निमगावचे उपसरपंच अजय जगताप,यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे . तसेच साई संस्थान कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, संचालक रवी गायकवाड ,रामा गागरे, कोकाटे, राजकुमार गडकरी, आदी अनेक क्षेत्रातील मान्यवर ,पत्रकार आदींनीही दुशिंग यांच्या वस्तीवर जाऊन भेट घेतली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button