Letest News
शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ... डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झाला’- रोहित पवारांचा बोचरा पलटवार उदयपूर ते शिर्डी सातवी पदयात्रा भक्तिभावात पूर्ण- साईभक्त मोहित आचार्य यांचे शिर्डीत आगमन
राजकीयशिर्डी

उपमुख्यमंत्री अजित पवार देणार एकनिष्ठ संग्राम कोते यांना विधानपरिषदेवर संधी

शिर्डी प्रतिनिधी
पक्ष संघटनेत पूर्वापासून सक्रीय असलेले शिर्डीतील संग्राम कोते पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते. आज दिवसभरात त्यावर शिक्कामोर्तब होऊन उदया शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे. पक्षीय बलाबल पहाता ही निवडणूक बिनविरोध होण्याचीच अधिक शक्यता आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

विधानसभा निवडणुकीतील यशामुळे अनेकांना याचे वेध लागले आहेत. तर या निवडणुकीत पराभव झालेली मंडळीही यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे एकाला संधी दिली तर दुसरा नाराज, अशी स्थिती होऊ शकते. हे टाळण्याठी पवार वेगळा विचार करीत असल्याचे सांगण्यात येते.

त्यातून शिर्डीचे संग्राम कोते पाटील, झिशान झिद्दीकी, आनंद परांजपे यांची नावे पुढे आली आहेत. जागा राष्ट्रवादीची असली तर त्यासाठी मतदान तिन्ही पक्षांच्या आमदारांचे होणार आहे. त्यामुळे त्यांना चालणारा उमेदवारच द्यावा लागणार आहे. अशा चर्चेनंतर कोतेपाटील यांचे नाव जवळपास नक्की झाल्याचे सांगण्यात येते.

कोते पाटील यांनी राष्ट्रवादी काँगेस एकसंघ असताना विद्यार्थी संघटनेपासून पक्षात काम केले आहे. पक्षफुटीनंतर त्यांनी अजित पवारांनाच साथ दिली. अजितदादांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. शिर्डीत अलीकडेच झालेल्या पक्षाच्या अधिवेशानाची जबाबदारी त्यांच्यावरच सोपविण्यात आली होती

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button