Letest News
राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती?
क्राईमशिर्डी

shirdi news:-संतप्त ग्रामस्थांनी शिर्डीतील वेश्याव्यसाय बंद होण्यासाठी दिले पोलीस निरीक्षक यांना अर्ज 

संतप्त ग्रामस्थांनी शिर्डीतील वेश्याव्यसाय बंद होण्यासाठी दिले पोलीस निरीक्षक यांना अर्ज

शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून, शहराचे पवित्र जपणे हे सर्व नागरिक व प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे, परंतु गेल्या काही वर्षात शिर्डी शहरामध्ये वेश्या व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे निदर्शनास आले आहे, श्री साईबाबा मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हरिभाऊ शेळके कॉर्नर ह्या  ठिकाणी वेश्या व्यवसाय जोमाने सुरू आहे,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अनेक वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला ह्या सदरील ठिकाणी उभ्या असल्याने बाहेरील येणारे लोक सर्वच महिलांकडे अत्यंत घाणेरड्या वासनेने वाईट दृष्टीने बघत आहेत त्यामुळे शिर्डी शहरातील साईभक्त महिला, तरुण मुली, शाळकरी विद्यार्थीनी, महिला भगिनींचे पालखी रोड व मंदिर परिसरात जाणे येणे अवघड व आव्हानात्मक झाले आहे, शिर्डी पोलीस व प्रशासनाकडून अनेक वेळा कारवाई होऊनही यावर आवर घालण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे,


 शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर तक्रार व विनंती आहे की, शिर्डी शहरातील साई पालखी रोड, कानिफनाथ मंदिर चौक, बी एस एन एल कार्यालय ते संजीवनी कॉम्प्लेक्स दरम्यान, नवीन पिंपळवाडी रोड, शिर्डी बस स्थानक येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसाय व सदरील महिलांकडून होत असलेले अश्लील चाळे, अश्लील हातवारे, अवैध देह विक्री व्यवसाय, अवैध कुंटन खाने चालविण्यात येत आहे याबाबत तक्रार अर्ज दाखल केला आहे तसेच 

निवेदनाद्वारे जाहीर मागण्या खालीलप्रमाणे :-
वरनमूद ठिकाणी उभ्या असलेल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा,  सदरील वेश्या व्यवसाय थांबविण्यात यावा व सदरील महिलांना अटक करण्यात यावी, सदरील महिलांचे मेडिकल टेस्ट करून त्यांना पुनर्वसन व सुधारगृहात पाठविण्यात यावे,शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने वाढत्या वेश्या व्यवसायावर आळा घालण्यासाठी शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले ,


शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंभार साहेब यांना निवेदन सोपविण्यात आले,यावेळी लवकरच कारवाही करून शिर्डीचे पावित्र जपले जाईल याची खात्री अधिकारी वर्गाने दिली यावेळी ॲड. विक्रांत वाघचौरे, सुरेश आरणे, सुनील परदेशी, राकेश भोकरे, संजय शिंदे पा, तान्हाजी गोंदकर पा, रोहित सोळंकी, शिवाजी भोंडगे, दीपक रणधीर, सुरेश गुगळे, ॲड. अविनाश शेजवळ आदी शिर्डी ग्रामस्थांनी उपस्थित राहून तक्रार नोंदविली

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button